◻ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी याच्याकडे आश्वीचे संजय दास्ताने याची मागणी.
संगमनेर Live (मुबंई) | कोरोना काळात मंदिरा समवेत धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. यामुळे धार्मिक पुजा आर्चा करणारे पुरोहित व पुजा साहित्य विक्रेते यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी याच्या कडे संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल सामाजिक कार्यकर्ते व वसंत स्मृती सामाजिक संस्था मुंबई चे अध्यक्ष संजय दास्ताने यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नुकतीच वसंत स्मृती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय दास्ताने, मुंबई भाजप चे उपाध्यक्ष पवनकुमार त्रिपाठी, धार्मिक व अध्यात्मिक आघाडीचे संयोजक सुरेशजी मिश्रा, प्रमोद मिश्रा यांनी राजभवन येथे जाऊन भेट घेतली व राज्यातील पौरिहित्य करणारे पुरोहित व त्या बरोबर पूजा साहित्य विक्रेते यांना गेले दीड - दोन वर्ष आपली गृहस्तिथी चालवणे अवघड झाले, त्या मुळे महाराष्ट्र सरकारने कर्नाटक व मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर आर्थिक मदत करावी तसेच या कुटुंबाना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदन देऊन केली.
दरम्यान यावेळी राज्यपाल कोश्यारी यानी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.