◻ कोविड - १९ मुळे रोजगार गमाल्याने उदरनिर्वाहासाठी मुबंईला गेले होते सूळ कुटुंब.
संगमनेर Live | मुबंईत झालेल्या मुसळधार पावसामुळे तुडंब भरलेल्या नाल्याने पानोडी येथिल रहिवासी असलेल्या व कामानिमित्त मुबंई येथे पालकासमवेत गेलेल्या साडेचार वर्षीय चिमुकलीचा बळी घेतल्यामुळे पानोडी सह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मागील वर्षी कोविड - १९ च्या संसर्ग वाढल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न संतोष सुळ याच्यापुढे निर्माण झाल्यामुळे उदरनिर्वाहासाठी पत्नी व मुलीला घेऊन ते मुंबईला गेले होते.
मागील दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुंबई सह परिसरात पाऊस सुरु असल्याने मुबंईतील नाले तुडुंब भरले आहेत. संतोष सुळ याची मुलगी पुर्वा गुरुवारी दुपारच्या सुमारास खेळण्यासाठी घरातून बाहेर आली होती. बराचं वेळ होऊनही मुलगी परत न आल्याने सुळ यानी शोधाशोध सुरु केली. यावेळी घरालगत असलेल्या नाल्यामध्ये पुर्वाचा मृतदेह आढळून आला.
संतोष सुळ याची पुर्वा ही एकुलती एक मुलगी होती. तिच्या अकस्मात मृत्यूमुळे सुळ कुटुंबासह पानोडी परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान पुर्वा हिच्या पश्चात आई, वडील, आजोबा, आजी व चुलते असा मोठा परिवार आहे.