संगमनेर Live | संगमनेर तालुक्याला शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला असून तालुक्यात (४ जून) अवघे ४० कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहे. तर आश्वी परिसरातील उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, कनोली, शिबलापूर व निमगावजाळी या गावानमध्ये पुन्हा बाधीत रुग्ण आढळले आहेत.
शुक्रवारी संगमनेरच्या शहरी भागात अवघे २, उंबरी बाळापूर येथे १, आश्वी बुद्रुक येथे २, आश्वी खुर्द येथे २, शिबलापूर येथे १, निमगावजाळी येथे १, कनोली येथे १, अंभोरे येथे १, जवळे बाळेश्वर येथे ४, निमगाव टेंभी येथे २, वाघापूर येथे १, पेमगिरी येथे १, निमगावपागा येथे २, देवगाव येथे १, गुंजाळवाडी येथे १, वेल्हाळे येथे १, पोखरी हवेली येथे १, खराडी येथे १, कासार दुमला येथे १, राजापूर येथे १, पावबाकी येथे १, सुकेवाडी येथे १, निमोण येथे १, वडगावपान येथे १, खांबे येथे २, करुले येथे १, तळेगाव दिघे येथे १, चंदनापूरी येथे ३ व झोळे येथे १ असे एकून ४० कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील सहा गावानमध्ये शनिवारी पुन्हा बाधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी मास्क लावणे तसेच शासकीय नियमाचे पालण करावे असे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस, महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
 

