संगमनेर Live | नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. तालुक्यातील पूर्वेकडे असलेल्या २८ गावांमध्ये नागरिकांनी नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर कायम भरभरून प्रेम केले असून त्यांच्या नेतृत्वावर या जनतेचा कायम विश्वास असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक गणपतराव सांगळे यांनी केले आहे.
नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वी गटातील चणेगाव, झरेकाठी, दाढ खुर्द, हंगेवाडी, मनोली येथे बांधकाम कामगार साहित्याचे वाटप आज करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, जिल्हा बॅकेचे संचालक गणपतराव सांगळे, उपसभापती नवनाथ अरगडे, राजहंस दुध संघाचे संचालक राजेंद्र चकोर, डॉक्टर गंगाधर चव्हाण, विजय हिंगे, प्रभाकर बेंद्रे, अभिजीत बेंद्रे,जनसेवक वेणुनाथ सानप अदिंसह विविध मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गणपतराव सांगळे म्हणाले की, संगमनेर तालुका हा सहकाराचे मॉडेल आहे. ग्रामपातळीवर सहकारी संस्था सक्षम आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. नामदार बाळासाहेब थोरात यांनी या तालुक्याचे नेतृत्व करताना सततच्या विकास कामातून हा तालुका राज्यात आदर्श आदर्शवत बनविला आहे. २८ गावातील जनतेने नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर कायम भरभरून प्रेम केले आहे. नामदार थोरात यांनीही या जनतेप्रती कायम आदर ठेवून सातत्याने येथे विकास योजना राबवल्या आहेत. असंघटित कामगार हा उपेक्षित राहिला होता म्हणून इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाच्या वतीने विशेष यंत्रणा राबत तालुक्यातील सुमारे ६ हजार घरेलू कामगार,बांधकाम कामगार यांना संघटित करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.
कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ म्हणाले की, काँग्रेस पक्षाने कायम गोरगरिबांच्या विकासाच्या योजना राबविल्या आहेत. जिल्हा असंघटित कामगार संघटनेच्या वतीने संगमनेर तालुक्यात सर्वाधिक काम केले आहे. याचे श्रेय नामदार बाळासाहेब थोरात व इंद्रजीत थोरात यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाला आहे. सध्या भाजपाने राज्यात दूषित वातावरण केले आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत विकासकामांच्या कायम पाठीशी रहा असेही ते म्हणाले.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत बेंद्रे यांनी केले तर राजेंद्र चकोर यांनी आभार मानले. यावेळी विविध गावांमधील कार्यकर्ते व लाभार्थी यांना उपस्थित होते घरेलू कामगार बांधकाम कामगार यांना साहित्य पेटी, बॅटरी, रेनकोट, मच्छरदानी यांसह बांधकाम साहित्याचे वितरण करण्यात आले.