◻ सावरगातळ, शेडगाव, आश्वी खुर्द, खळी आदि गावानमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरुचं.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात रविवारी (८ ऑगस्ट २०२१) ११४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून शनिवारी आश्वी परिसरातील ८ गावानमध्ये पुन्हा १६ बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस बाधीताची संख्या वाढत असल्याने नागरीकानी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवारी संगमनेरच्या शहरी भागात ३, आश्वी खुर्द येथे ५, शेडगाव येथे २, पिप्रीं येथे १, ओझर बुद्रुक येथे २, खळी येथे १, रहिमपूर येथे १, मनोली येथे २, कणकापूर येथे २, अंभोरे येथे १, वरंवडी येथे १, मांडवे बुद्रुक येथे २, सावरगाव तळ येथे ९, हिवरगाव पठार येथे १, कौठेमलकापूर येथे १, दरेवाडी येथे १, पोखरी बाळेश्वर येथे १, निमगाव बुद्रुक येथे २, रायते येथे ३, वडगावपान येथे १, अकलापूर येथे २, कुकुटवाडी येथे २,
वरंवडी पठार येथे १, साकूर येथे ३, पिपळगाव कोझिंरा येथे १, गुंजाळवाडी येथे १, वडझरी खुर्द येथे २, तळेगाव दिघे येथे २, खंदारमाळ येथे ४, आंबी खालसा येथे ४, दरेवाडी येथे १, घारगाव येथे २, हिरेवाडी येथे १, हिवरगाव येथे १, जाबुंत येथे २, लोहारे येथे १, म्हसंवडी येथे १, सोनेवाडी येथे २, पळसखेडे येथे १, नादूंर येथे ३, कसार दुमला येथे १, बोटा येथे १ व जवळे कडलग येथे ४ असे ८६ कोरोना बाधीत रुग्ण शनिवारी आढळून आले असून रविवारी (८ ऑगस्ट) ११४ बाधीत रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी खुर्द, शेडगाव, पिप्रीं, खळी, रहिमपूर, ओझर बुद्रुक आदि ८ गावामध्ये पुन्हा बाधीत १६ रुग्ण आढळल्यामुळे नागरीकानी सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना मास्क घालने बंधनकारक असून नागरीकानी योग्य ती काळजी घेऊन स्वता:चे व कुटुंबाचे संरक्षण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
चिकनगुन्या आजाराचे रुग्ण वाढले..
कोरोनाचे संकट असताना आश्वी सह परिसरातील गावानमध्ये चिकनगुन्या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत औषध फवारणीसह विविध उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. तर नागरीकानी कोणताही आजार आगांवर न काढता त्यासाठी डॉक्टरांच्या सल्याने औषध उपचार करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे नागरीकानी घर व परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरचं खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.