संगमनेर Live | १८५७ पासून सुरु झालेल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक थोर पुरुषांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले स्वातंत्र्यलढ्यातील सर्व राष्ट्रपुरुषांचे व स्वातंत्र्यसैनिकांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अनमोल असून त्यांच्या विचारांचा आदर्श घेवुन तरुण पिढीने काम करावे असे अवाहन नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी केले असून काँग्रेसच्यावतीने ९ ऑगस्ट क्रांती दिन प्रभात फेरी काढून साजरा करण्यात आला.
संगमनेर नगरपालिका, शहर काँग्रेस कमिटी, जय हिंद युवा मंच यांच्या वतीने शहरात ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अभिवादन व प्रभातफेरी याचबरोबर यशोधन कार्यालयात आदिवासी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब डांगरे, शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, गुलाबराव ढोले गुरुजी, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, सौ. निर्मलाताई गुंजाळ, सौ. सौदामिनी कान्हेरे, अनुराधा आहेर, शालन गुंजाळ, नंदा बागुल, नगरसेवक नितीन अभंग, किशोर टोकसे, प्रा. एम. वाय. दिघे, जीवन पंचारिया, बाळू काळे, लाला दायमा, गणेश मादास, अरुण ताजणे, मुस्ताक शेख, गौरव डोंगरे, शेखर सोसे, राणी प्रसाद मुंदडा, उपसभापती नवनाथ आरगडे, तात्याराम कुटे, जालिंदर ढोकरट आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी नेहरू चौक येथील अशोक स्तंभास अभिवादन करण्यात आले. तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब डांगरे यांचा सत्कार करण्यात आला. नेहरू चौक गांधी, स्वतंत्र्य चौक अशी प्रभात फेरी काढून घोषणा देण्यात आल्या.
यावेळी सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि, देशाच्या स्वातंत्र्य लढयात महात्मा गांधी व काँग्रेस विचारांचा मोठा वाटा आहे. महात्मा गांधींनी ९ ऑगस्टच्या क्रांती दिनी इंग्रजांना चले जाव चा नारा देत संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचे आंदोलन व्यापक केले. या स्वातंत्र्यलढ्यात अनेक राष्ट्रपुरुष, कार्यकर्ते, आदिवासी नेते यांचे मोठे योगदान राहिले आहे. घटनेने लोकशाही ही लोकांना दिलेली ताकद आहे. तुमच्यावर अन्याय झाला तर न्याय देण्याचे काम लोकशाही मध्ये आहे. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास सर्वांना कायम प्रेरणा देणारा आहे. स्वातंत्र सैनिकांच्या योगदानाचा आदर्श घेत युवकांनी देशाच्या एकात्मतेसाठी व अखंडतेसाठी काम करणे गरजेचे आहे. लोकशाही टिकविण्यासाठी व भारताच्या विकासासाठी काम करतांना तरुणांनी शिक्षण घेवून आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
विश्वासराव मुर्तडक म्हणाले कि, महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील आदिवासी, गोरगरिब बांधवांच्या विकासासाठी सातत्याने काम केले जात आहे. प्रत्येक गणातील जनसेवकांच्या माध्यमातून वाडी वस्तीवर रेशनकार्ड, विविध दाखले व विविध योजना देण्याचे काम केले जात आहे. हा गोरगरिबांच्या विकासाचा संगमनेर पॅटर्न आता राज्याला दिशादर्शक ठरत आहे. यावेळी आदिवासी सेवक बाळकृष्ण गांडाळ, पी. वाय. दिघे, नामदेव कहांडळ, संजय कोल्हे आदि उपस्थित होते.