संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल शेतकरी कुटुंबातील नंदकिशोर बाळकृष्ण लाहोटी यांचा मुलगा किरण नंदकिशोर लाहोटी हा पहिल्याचं प्रयत्नात सीए ची परिक्षा उत्तीर्ण झाला असून त्याचे आश्वी सह पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.
किरण लाहोटी याने मांचीहिल येथिल ज्ञानगंगा विद्यानिकेतन, संगमनेर येथिल ध्रुव अँकाडमी तसेच पुणे येथे शिक्षण पुर्ण केले आहे. मेहनतीच्या जोरावर आवघ्या २३ व्या वर्षी सीए ची पदवी संपादित केलेल्या किरणने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील व शिक्षकाना दिले आहे.
दरम्यान किरणच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संजय मालपाणी, अँड. शाळीग्राम होडगर, शिक्षक दिघे, गुणे, माहेश्वरी सभा, जैन संघटना, प्रवरा परिसर युवा संघटन, अहमदनगर जिल्हा युवा संघटन, नातेवाईक, मित्रपरिवार तसेचं आश्वी पंचक्रोशीतील नागरीकानी अभिनंदन केले आहे.