संगमनेर Live | अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील अग्रमांनाकीत शिक्षण संस्थानमध्ये समावेश असलेल्या पद्मभुषन लोकनेते बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालक पदी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक जिल्हापरिषद गटाच्या कर्तव्यदक्ष सदंस्या अँड. रोहिनीताई किशोर निघुते याची निवड झाली आहे.
भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील याच्यां अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संस्थेच्या बैठकीत अँड. अँड. रोहिनीताई किशोर निघुते याची संचालक पदी सर्वानुमते निवड प्रक्रिया पार पडली आहे.
यामध्ये आश्वी खुर्द पंचायत समितीचे सदंस्य निवृत्ती सांगळे (शेडगाव), कैलास तांबे (चिचंपूर) भाऊसाहेब बा. जऱ्हाड (आश्वी बुद्रुक), अँड. पोपटराव वाणी (झरेकाठी), मच्छिद्रं पावडे (चणेगाव), गणपतराव शिदें (रहिमपूर), अलका दिघे (कोल्हेवाडी), दिलिप इंगळे (जोर्वे), ज्ञानदेव पर्वत वर्पे (कनोली) व रखमाजी खेमनर (डिग्रंस) आदिचीही संचालक पदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान आ. राधाकृष्ण विखे पाटील यानी मोठी जबाबदारी दिल्यामुळे अँड. निघुते यानी त्याचे आभार मानले असून शिक्षणक्षेत्रात उल्लेखणीय काम करणार असल्याचे सुतोवाचन केले आहे. निवड झाल्याची माहिती मिळल्यानतंर जेष्ठ पत्रकार सिताराम चांडे, संजय गायकवाड, योगेश रातडीया, रविद्रं बालोटे, अनिल शेळके तसेच दिपक सोनवणे व रामदास साळवे यानी अँड. निघुते याची भेट घेऊन अभिनंदन करत शुंभेच्छां दिल्या आहेत. तर आश्वी सह पंचक्रोशीतील नागरीकानकडूनही अँड. निघुते याचे अभिनंदन होत आहे.