◻ आश्वी बुद्रुक येथिल स्टेट बँकेकडून खळी येथिल कुटुंबाला २ लाख विमा रक्कम सुपुर्द.
संगमनेर Live | मागील दिड वर्षात कोविड - १९ ने अनेक व्यक्तीचे बळी घेतले असून यामध्ये अनेक चिमुकल्यांच्या डोक्यावरील आई वडीलाचे छत्र हारपले आहे. संगमनेर तालुक्यातील खळी येथिल एका कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा कोरोनाने बळी घेतल्यामुळे कुटुंबापुढे मोठे अर्थिक संकट उभे ठाकले. आशा काळात आश्वी बुद्रुक येथिल स्टेट बँक आँफ इंडिया ने त्या मृत व्यक्तीच्या जीवन ज्योती विमा योजनेची रक्कम त्या कुटुंबाकडे सुपुर्द करत कुटुंबाला मोठा आधार दिला आहे.
काही महिन्यापूर्वी आश्वी बुद्रुक येथिल स्टेट बँक आँफ इंडियाने परिसरातील गावानमध्ये शिबाराचे आयोजन करत बँकेच्या विविध योजनाची माहिती देऊन अनेक खातेदाराचा विमा उतरवला होता. यावेळी विमा उतरवण्यास विरोध केलेल्या व्यक्तीचा दुर्दैवाने कोविड - १९ ने बळी घेतल्यामुळे त्याच्या कुटुंबाला विमा रक्कम देण्यात आली असून यासाठी स्टेट बँक आँफ इंडियाचे माजी शाखा व्यवस्थापक जनार्धन बोतले, व्यवस्थापक सचिन दरंगे, किरण पाचोरे, सुवर्णा तिडके, तुषार भडकवाड व आश्वी बुद्रुक येथिल ग्राहक सेवा केंद्राचे सुनील घोडेकर, विवेक जगताप, रमेश कुऱ्हाडे यानी मोठे परिश्रम घेतले.
दरम्यान नुकताचं जीवन ज्योती विमा योजनेचा धनादेश कुटुंबीयाकडे सोपवण्यात आला असून यावेळी प्रतिष्ठित व्यापारी सुशिल भंडारी, योगेश रातडीया, पत्रकार संजय गायकवाड, खळीचे सरपंच विलास वाघमारे, चिचंपूरचे सरपंच विवेक तांबे, आश्वी खुर्द चे सरपंच म्हाळू गायकवाड, बबनराव शिदें आदिसह बँकेचे अधिकारी व सेवा केद्रं चालक उपस्थित होते.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत संगमनेर तालुका हॉटस्पॉट ठरला असून या काळात अनेक मृत्यू झाले. त्यात अनेक घरातील अनेक कर्ते गेले. ज्याच्या कष्टावर घरातील चूल पेटत होती, तोच न राहिल्याने सामान्य कुटुंबातील महिला, मुले निराधार झाली आहेत. शेती नाही, बँकेत ठेव नाही, निश्चित रोजगार मिळेल असा व्यवसाय नसल्याने अनेक कुटुंबे ही हातबल झालेली पहावयास मिळत आहेत.
दरम्यान उदरनिर्वाह सह मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्नं निर्माण झाला असताना स्टेट बँक आँफ इंडियाच्या विमा योजनेमुळे मोडून पडलेली कुटुंबे सावरण्यास मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकानी स्टेट बँक आँफ इंडियाच्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या सेवा केद्रं अथवा बँक शाखेशी संपर्क करावा असे आवाहन शाखा व्यवस्थापक सचिन दरंगे यानी केले आहे.