◻ आतापर्यत ७० पेक्षा जास्त गावात जाऊन केली स्वच्छता. परिसर स्वच्छतेसह निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा आवलिया.
संगमनेर Live | भारतातील बहुतांशी गाव खेड्यातील वाड्या वस्त्यापर्यत शिक्षण, पाश्चात्य संस्कृती व विकासाची साधने पोहचली असली तरी संत गाडगेबाबानी दिलेला ग्राम स्वच्छतेचा संदेश मात्र आद्यापही पोहचला नसल्यामुळे आपल्याला आजही सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिग, तुबलेल्या गंटारी अस्वच्छ राहणीमान पाहवयास मिळत असल्याने आरोग्याच्या मोठ्या समस्या भेडसवण्यास सुरवात झाली आहे.
त्यामुळे मागील ३ महिन्यापासून गावा - गावात जाऊन परिसर स्वच्छतेसह निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारे अकोले तालुक्याचे भुमिपुत्र हरिभाऊ ज्ञानोबा उगले हे संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा याचे कार्य पुढे नेत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या ‘ स्वच्छ भारत ’ अभियानाला बळकटी देण्याचे काम करत आहेत.
७ वी पर्यत शिक्षण झालेले व हाडाचे शेतकरी असलेले हरिभाऊ उगले (रा. डोगंरगाव, ता. अकोले) हे ‘ सेवक स्वच्छते’चा हा फलक घेऊन मागील ३ महिन्यापासून ७० पेक्षा जास्त गावा - गावात जाऊन तेथील मंदिर परिसर, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करून निसर्ग संवर्धनासह संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा या महापुरुषाच्या स्वच्छतेचा संदेश नागरीकापर्यत पोहचवून प्रबोधन करत आहेत. यासाठी ते कोणतीही मदत अथव मोबदला न घेता आवड व सेवा म्हणून स्वच्छतेचे काम करत असून विशेष म्हणजे कोरोनाचे संकट असतानाही त्याच्या स्वच्छता कार्यात कुठलाही खंड पडलेला नाही.
भारताचे राष्टपती ए. पी. जे. अब्दुल कलाम याना आदर्श माननारे हरिभाऊ उगले याचे निस्वार्थ सेवा स्वच्छतेच्या कामाचे गावागात स्वागत होत असून त्याचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव होत आहे. नुकतेचं हरिभाऊ उगले हे उंबरी बाळापूर येथे स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी हनुमान मंदिर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता केली असून याप्रसंगी उपसरपंच नानासाहेब उंबरकर यानी प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले असून यावेळी संजय मैड, संजय शिदें, जेष्ठ पत्रकार सुरेश थोरात उपस्थित होते. शरीर साथ देईल तोपर्यत हे सेवा कार्य करत राहणार असल्याची प्रतिक्रिया उगले यानी दिली आहे.
आपले घर, परिसर, गाव स्वच्छ ठेवा हळूहळू आपला तालुका, जिल्हा, राज्य आणि देश स्वच्छ राहील. हा संत गाडगेबाबाचा विचार घेऊन गाव स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी झटणाऱ्या हरिभाऊ उगले याचे प्रत्येक व्यक्तीने अनुकरण करण्याची गरज आहे. कारण स्वच्छतेमुळेचं देशाबरोबरचं गाव खेड्यात राहणाऱ्या नागरीकाना स्वच्छ पर्यावरण व चागले आरोग्य मिळणार असल्याने सर्वानी आपले घर व परिसर स्वच्छतेचा संकल्प करायला हवा.
सुरेश थोरात, जेष्ठ पत्रकार तथा ग्रामस्थं उंबरी बाळापूर