◻ कोतवाली पोलीस ठाण्यात हजर होताचं कारवाईचा धडाका.
संगमनेर Live | कोतवाली पोलिस ठाण्यात नुकतेचं दाखल झालेले पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी बेकायदेशीर रित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळत गुन्हेगारासह अवैध धंदे करणाराची गय केली जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास केडगाव शिवारात एक जण गावठी कट्टयासह दुचाकीवर फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे याना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यामुळे त्यानी पोसई मनोज कचरे, पोना बंडू भागवत, पोना शाहिद शेख, पोना नितीन गाडगे, पोकॉ सुमित गवळी, पोकॉ अभय कदम, पोकॉ प्रमोद लहारे, पोकॉ सुशील वाघेला यांच्या पथकाला कारवाईच्या योग्य त्या सुचना दिल्या.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाने केडगाव भागात सापळा रचुन कारमेल शाळेजवळ एक संशयीत व्यक्तीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान भूषण निकम (रा. काकासाहेब म्हस्के रोड एमआयडीसी) असे त्याचे नाव असल्याची माहिती मिळाली व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुस आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडून दुचाकीसह ४५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७१७/२०२१ नुसार आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या आरोपी विरूद्ध यापुर्वीही राहुरी व भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागिय पोलीस अधिकारी अजित पाटील याच्यां मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव शिदें व त्याच्या सहकाऱ्यानी ही कामगिरी केली आहे.
मुळचे उंबरी बाळापूर (ता. संगमनेर) येथिल रहिवासी असलेले पोलीस निरीक्षक संपतराव शिदें यांची नुकतीचं बेलवंडी पोलीस ठाण्यातून कोतवाली पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. त्यानी आतापर्यत कार्यरत असलेल्या विविध ठिकाणी आपल्या चागल्या कामाचा ठसा उटवला आहे. त्यामुळे आता कोतवाली पोलीस ठाणे परिसरातील अवैध धंद्ये करणाऱ्यासह गुन्हेगाराचे ही धाबे दणाणले आहेत.