ना. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उद्या एकवीरा मार्केटचे लोकार्पण.

संगमनेर Live
0

संगमनेर Live | कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या व तरुणींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कार्यरत असलेल्या एकविरा फाउंडेशन च्या वतीने गणेशोत्सव काळात शाडू गणेश मूर्ती व विविध वस्तूंच्या विक्रीसाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर असलेल्या एकविरा मार्केटचा लोकार्पण सोहळा राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, फाउंडर दि वुमन्स च्या कुमारी दिशा दिंडे यांच्या उपस्थित उद्या रविवार दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता यशोधन समोरील प्रांगणात होणार आहे.

डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाऊंडेशनने मागील तीन वर्षांमध्ये गणेश उत्सव काळात निर्माल्य संकलन, शाडू गणेश मूर्तीची विक्री, महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन, हिमोग्लोबिन तपासणी, आदिवासी महिलांसाठी काम, शालेय शिक्षण विभागात मदत, कोरोना संकटात मदत अशा विविध ठिकाणी लोकाभिमुख उपक्रम राबविले आहे. प्रदूषण विरहित गणेश उत्सव व्हावा यासाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने यावर्षी यशोधन संपर्क कार्यालयासमोरील प्रांगणात एकविरा मार्केटचे आयोजन करण्यात आले आहे.

याचा लोकार्पण सोहळा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थित होणार असून यावेळी पुण्याच्या वुमन्स फाउंडर कुमारी दिशा दिंडे या उपस्थित राहणार आहे. तसेच राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. कांचनताई थोरात, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, शरयुताई देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्री थोरात, मीराताई शेटे, सौ. सुनंदाताई जोर्वेकर यांसह विविध महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

दरम्यान या कार्यक्रमासाठी महिला, तरुणी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन एकविरा फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !