◻ आश्वी खुर्द ग्रामपंचायतीकडून १०० टक्के लसीकरणासाठी कडक नियमावली.
संगमनेर Live | काही महिन्यापूर्वी आश्वी खुर्द आरोग्य केद्रांत पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करत गोंधळ घातला होता. प्रसंगी आरोग्य कर्मचार्यांशी शाब्दीक चकमकीही झाल्या. काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत असून आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांना लस घेण्यासाठी वारवार आवाहन करत आहेत.
परंतु, प्रत्यक्षात संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल बेजबाबदार नागरीक लसीकरणासाठी पुढे येत नसल्यामुळे येथे पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊन उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे लस न घेणाऱ्या नागरीकाचे रेशन व ग्रामपंचायत दाखले न देण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आणू नका अशा सूचना सरपंच म्हाळू गायकवाड यानी नागरीकाना देऊन १०० टक्के लसीकरणासाठी कडक नियमावलीची आमलंबजावणी केले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
आश्वीसह परिसरातील गावानमध्ये करोना बाधीताची रुग्णसंख्या वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वी खुर्द सह अनेक गावे लॉकडाऊन करुन या गावनमध्ये लसीकरणावर भर दिला आहे. आश्वी खुर्द गावची लोकसंख्या ५ हजारांच्या आसपास असून १८ वर्षावरील लसीकरणाला पात्र संख्या ४ हजारांच्या जवळ आहे. गावात आतापर्यत ३ हजार २०० नागरीकाचे लसीकरण झाले आहे.
आश्वी खुर्द येथे नियमित लसीकरण शिबिराचे आयोजन होऊनही बेजबाबदार नागरीक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याने आलेले लसीचे ढोस शिल्लक राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे बेजबाबदार नागरीकामुळे कोरोनाचा पुन्हा याठिकाणी उद्रेंक झाल्यास जबाबदार कोण.? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्यामुळे आश्वी खुर्द ग्रामपंचायतीने याबाबत पुढाकार घेतला असून गावतील नागरीकांची सुरक्षितता व हीत लक्षात घेता ज्या नागरिकडून लसीकरणाला टाळटाळ होत आहे, अशा नागरिकांचे रेशन व ग्रामपंचायत दाखले आदिबाबत कडक धोरण घेतले जाण्याची शक्यता आहे.
तसेच गावातील सर्व व्यापारी, दुकानदार व भाजीपाला विक्रेते यांच्या लसीकरणाची पडताळणी ग्रामपंचायत पातळीवर होणार असल्याने उर्वरित ग्रामस्थांसह व्यावसायिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सरपंच म्हाळू गायकवाड, उपसरपंच सुनिल माढंरे, सर्व ग्रामपंचायत सदंस्य व आरोग्य विभागाने केले आहे.