लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये कडकडीत बंद.

संगमनेर Live
0
संगमनेर Live | उत्तर प्रदेशातील लखीमपूर लखिंपुर येथे आंदोलन ग्रस्त शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारण्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने संगमनेर मध्ये महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आ डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट पक्ष, आरपीआय गवई गट, छात्रभारती, पुरोगामी व इतर मित्र पक्षांच्या वतीने करण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संगमनेर शहर व तालुक्यातील बहुताशं गावांनमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

लखीमपुर - खिरी येथील ४ शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने चिरडून ठार मारले ही घटना अत्यंत निंदनीय असून न्याय हक्क मागणाऱ्या शेतकऱ्यांना लोकशाहीमध्ये चिरडल्याच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आला. यावेळी संगमनेर बस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, संजय फड, राष्ट्रवादीचे कपिल पवार, प्रशांत वामन, निखिल पापडेजा, सुभाष सांगळे, शेखर सोसे, गौरव डोंगरे, नितीन अभंग, हैदर अली, अंबादास आडेप, डॉ. अभय सिंह जोंधळे यांसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना व मित्र पक्षांचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी संगमनेर तालुक्यात व शहरामध्ये पूर्ण कडकडीत बंद पाळून लखिमपुर घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी बाजार समिती, बस स्थानक, मेन रोड, बाजार पेठ यांसह सर्व महाविद्यालय, शाळा, दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. सहकारातील अग्रगण्य असणारा अमृत उद्योग समूह ही या बंदमध्ये संपूर्ण सामील झाला होता. देवकौठे ते बोटा अशा विस्तीर्ण तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये हा कडकडीत बंद पाळण्यात आला. यामध्ये बाजारपेठ असणाऱ्या तळेगाव दिघे, साकुर, धांदरफळ, घुलेवाडी, वडगाव पान, चंदनापुरी, जोर्वे, निमोन, समनापुर या गावांमध्येही सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध करत कडकडीत बंद केला.

यावेळी सत्यजित तांबे म्हणाले की, केंद्रातील सरकार ही अत्यंत संवेदनाहीन आहे. शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घालून केंद्रीय मंत्र्याचा मुलगा राजरोसपणे फिरतो आहे. त्याला व्हीआयपी वागणूक मिळत आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. शेतकऱ्यांच्या मारेकऱ्यांना फाशी ची शिक्षा झाली पाहिजे. ज्यांना भावना व मानवता आहे. त्या सर्व गोरगरीब बांधवांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. आज संगमनेर शहर व तालुका पूर्णपणे बंद आहे. राज्यामध्ये या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. युवक काँग्रेस ही या मध्ये अग्रभागी आहे. ज्या कोणी अगदी मोजक्या लोकांनी या बंदमध्ये सहभाग घेतला नाही. त्यांनी लखीमपुर घटनेचा व्हिडीओ पहावा. शेतकरी व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान मोदी सरकारच्या काळात झाला आहे. परंतु मानवतेच्या दृष्टीतून एक दिवस त्या व्यापाऱ्याने बंद ठेवायलाच पाहिजे. संगमनेर तालुका पूर्णपणे महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी असून या सरकारने घेतलेल्या या भूमिकेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले.

सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, भारताच्या पंतप्रधानांना अमेरिका व इतर देशांमध्ये जाण्यासाठी वेळ मिळतो. मात्र ज्या शेतकऱ्यांची हत्या झाली आहे त्यांच्या भेटीसाठी सुद्धा पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्री जाऊ शकत नाही हे अत्यंत निंदनीय आहे. हे सरकार पूर्णपणे शेतकरी व गोरगरिबांच्या विरोधी असून महागाई वाढत आहे. शेतकऱ्यांना मारत आहे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. राज्यात ना. उद्धव ठाकरे, ना. अजित पवार व नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकासआघाडी ही केंद्राच्या विरोधात भक्कम उभी राहिली असल्याचे त्या म्हणाल्या.

विश्वास मुर्तडक म्हणाले की, भाजपाने मीडिया ताब्यामध्ये घेतली आहे. एका बाजूला शेतकरी ठार मारत आहेत मात्र दुसर्‍या बाजूला चित्रपट तारकांच्या पाठीमागे विविध संस्था लावून माध्यमांचे लक्ष वळवले जात आहे अत्यंत निंदनीय आहे.

अमर कातारी म्हणाले की, ना. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र केंद्राच्या विरोधात उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना कायम महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी उभी आहे.

कपिल पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचा आजचा निर्णय अत्यंत चांगला असून हे सरकार गोरगरिबांचे व सर्वसामान्यांच्या आहे. या उलट केंद्रातील सरकारी शेतकरीविरोधी आहे. 

यावेळी मोदी हाय हाय च्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी शैलेश कलंत्री, नितीन अभंग, जयवंत पवार, अनिल कांदळकर, दत्तू थोरात, जीवन पंचारिया, लक्ष्मण बर्गे, सौदामिनी कान्होरे, सादिक तांबोळी, किशोर टोकसे, ऋतिक राऊत, शफी तांबोळी, बाळासाहेब कानवडे, जावीद शेख, मुन्नाभाई फिटर, सतीश आहेर, दत्तू खुळे, राहुल वर्पे, मनीष माळवे, किरण घोटेकर उपस्थित होते
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !