◻ नानुबाई भागाजी गायकवाड यांचे ९६ व्या वर्षी निधन.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आदर्श माता गं. भा. नानुबाई भागाजी गायकवाड (वय - ९६) यांचे मंगळवारी रात्री वृध्दपकाळांने निधन झाले.
आई नानुबाई याच्या पश्चात पाच मुले, सुना, तीन मुली, जावई, नातवंडे, नातसुना व परतोडे असा मोठा परिवार आहे. आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हाळू गायकवाड, हभंप मोहनबाबा गायकवाड, सेवानिवृत्त परिवहन चालक पांडुरंग गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, सर्जेराव गायकवाड यांच्या त्या मातोश्री तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते कैलास गायकवाड, सचिन गायकवाड, नवनाथ गायकवाड, संदिप गायकवाड, सागर गायकवाड, भारत गायकवाड, आदिनाथ गायकवाड यांच्या त्या आजी होत.
दरम्यान बुधवारी सकाळी शोकाकूल वातावरणात प्रवरातीरावर अत्यंसंस्कार करण्यात आले असून यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदि क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीसह नातेवाईक, आप्तेष्ट यानी जड अतंकरणाने नानुआईला श्रध्दांजली अर्पण केली आहे.