◻ १ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल जप्त ; एक आरोपी फरार.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारात असलेल्या रस्त्यावर दारु बनवण्यासाठी उपयोगात येणारे रसायन पाठलाग करुन आश्वी पोलीसांनी एका वाहणातून जप्त केले असून यावेळी एक जणाला पोलिसानी ताब्यात घेतले तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. याबाबत पोलीस नाईक विनोद गंभिरे यानी आश्वी पोलीस ठाण्यात तक्रांर दाखल केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी पहाटे पोलीस नाईक विनोद गंभिरे, पोना. शांताराम झोडंगे, होमगार्ड मगेंश भुसारी व राहुल नागरे हे गस्त घालत असताना त्याना आश्वी खुर्द शिवारात एका छोटा हत्ती वाहणाचा (एम. एच. २३ एयु. १३८२) संशय आल्याने त्यानी गाडीचा पाठलाग केला. पोलीसाची गाडी पाहून त्या गाडीतील एक जण पळून गेला. यावेळी पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये ३० ते ३२ कँन आढळले. त्यामुळे गाडीतील व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी केली असता दारु बणवण्यासाठी उपयोगात येणारे स्पिरीट असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी हा मुद्देमाल आश्वी पोलीस ठाणे येथे आणून राज्य उत्पादन शुल्क संगमनेर याना याबाबत माहिती कळवली.
माहिती मिळताचं दुय्यम निरिक्षक ए. जे. यादव, व्ही. जी. सुर्यवंशी, सहाय्यक दुय्यम निरिक्षक एस. आर. वाघ, जवान व्ही. एम. पाटोळे, एस. जी. गुंजाळ, एस. डी. निमसे यानी आश्वी येथे येऊन पाहणी करत अल्कोहोलचा वास येत असल्याने या रसायनाचा दारु बनवण्यासाठी उपयोग होऊ शकतो असे सागितले. यावेळी सहाय्यक फौजदार तात्याराव वाघमारे यानी मुद्देमालाचा पंचनामा केला असून यावेळी पोलिसांनी ५१ हजार ८०० रुपये किमतीचे स्पिरीट सदृष्य रसायनाचे २८ कँन, १ लाख रुपये किमतीचे वाहन तसेच इतर असे १ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान आश्वी पोलिस ठाणे येथे आरोपी संकेत अनिल कुऱ्हाडे (रा. गोधवणी ता. श्रीरामपूर) याला ताब्यात घेऊन गुरंव नं - १६४/२०२१ नुसार महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई), ८३,९०, ९८ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक सुभाष भोये याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तात्याराव वाघमारे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.