ना. आठवलेकडून निमगावजाळी आरोग्य केद्रांचे प्रमुख डॉ. तांबोळी यांचा संन्मान.

संगमनेर Live
0
आ. विखे पाटील याच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना योध्दा पुरस्कारचे वितरण.

संगमनेर Live | स्वतःची व कुटुंबाची काळजी न करता रुग्णांची पर्यायाने समाजाची डॉक्टर, परिचारीका, आरोग्य कर्मचारी हे अहोरात्र रुग्ण सेवा करीत आहेत. आपल्या कार्याला व निस्वार्थ भावनेला आम्ही सलाम करतो असे गौरोउद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. आठवले यानी काढले आहेत.

ना. आठवले हे नुकतेचं अकोले व राहाता दौऱ्यावर आले होते. यावेळी राहता येथे झालेल्या मेळाव्यात निमगावजाळी आरोग्य केद्रांचे प्रमुख डॉ. तय्यब तांबोळी यांचा ‘ कोरोना योध्दा ’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इडिया (आठवले) चे जिल्ह्यातून आलेले जेष्ठ व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

निमगावजाळी आरोग्य केंद्र येथे आतापर्यत १० हजार २०६ नागरीकाची अँटीजन व ६ हजार ५९५ नागरीकाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये अनुक्रमे ६८४ व ७८२ असे बाधीत रुग्ण आढळून आले होते. तर निमगावजाळी, मांचीहिल व आश्वी खुर्द आरोग्य केद्रांअतर्गत आतापर्यत २ हजार ३५४ बाधीत रुग्ण आढळले असल्याने या सर्व बाधीत रुग्णावर डॉ. तय्यब तांबोळी व त्याच्या सहकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली अपवाद वगळता यशस्वी उपचार करण्यात आले. तसेच निमगावजाळी आरोग्य केद्रांअतर्गत आतापर्यत २९ हजार ३५० नागरीकाचे लसीकरण झाले असून यामध्ये १८ हजार ३८८ नागरीकानी लसीचा पहिला तर १० हजार ९०३ नागरीकानी लसीचा दुसरा ढोस घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात निमगावजाळी आरोग्य केद्रांचे काम कौतुकास्पद असल्याचे नागरीकाचे म्हणने आहे.

दरम्यान पुरस्कार मिळाल्यानतंर डॉ. ताबोळी यानी ना. आठवले व आ. विखे पाटील यांचे आभार मानले असून कोरोना आद्याप संपलेला नसल्यामुळे नागरीकानी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबरोबरचं दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा, प्रिय व्यक्तींबरोबर शक्य तितका वेळ घालवा, माणसं जिवंत असेपर्यंतच नातेसंबंधांचं महत्त्व आहे त्यामुळे ते ओळखून वागावे, कामातून पुरेसा वेळ काढून आवडीचं काही तरी करावे, आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, प्रत्येक क्षण आनंदाने, उत्साहाने जगावे. असे आवाहन डॉ. तांबोळी यानी केले आहे.

कुरणची रुग्णसंख्या आटोक्यात..

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाची मोठ्या प्रमाणात भिती असताना संगमनेर तालुक्यातील कुरण येथे मोठ्या संख्येने कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे नियम पाळण्याबाबत स्थानिक नागरीक व प्रशासनाचे सतत खटके उडत होते. या काळात कुरणची रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याचे शिवधनुष्य डॉ. तांबोळी यानी लिलया पेलत कुरणमधून कोरोना हद्दपार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !