संगमनेर Live | कुठलाही गाजावाजा, मिरवणूक न काढता अत्यंत शांतेच्या मार्गाने कोरोनाच्या सर्व शासकीय नियमाचे पालन करत संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल अष्टविनायक मित्र मंडळाच्या सदंस्यानी श्री क्षेत्र वणी येथून पायी ज्योत आणली असून ज्योत आश्वी खुर्द हद्दीत दाखल होताचं ज्योतीचे ग्रामस्थानी उत्साहात स्वागंत केले.
नवरात्र उत्सवाची गुरुवारपासून सुरवात होत असल्याने धार्मिकतेसह साधु संताचे पुजन करणारी भुमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आश्वी खुर्द येथिल अष्टविनायक मित्र मंडळाचे सदंस्य हे बुधवारी पहाटेचं श्री क्षेत्र वणी येथे दाखल झाले होते. त्यानतंर मंडळाच्या सदंस्यानी विधीवत ज्योत प्रज्वलित करुन आश्वीच्या दिशेने मार्गस्थ झाले.
श्री क्षेत्र वणी ते आश्वी खुर्द असा पायी प्रवास करुन गुरुवारी सकाळी अष्टविनायक मित्र मंडळाचे सदंस्य मंगलमय वातावरणात आश्वी खुर्द हद्दीत दाखल झाले. यावेळी ग्रामस्थानी ज्योतीचे विधीवत पुजन केले असून यावेळी उपस्थितानी देवीला कोरोनाचे महासंकट दूर व्हावे तसेच शेतकरी समृध्द व्हावा यासाठी गाऱ्हाने घातले आहे.
दरम्यान मंडळाच्या वतीने धर्मिक विधिसह घटस्थापना केली आहे. पायी ज्योतीचे हे चौथे वर्ष असून याआधी मंडळाने नेमबाई, कोल्हार व मोहटा येथून पायी ज्योत आणली आहे.