संगमनेर Live | मागील दिड वर्षापासून आहोरात्र कोरोना बाधीत रुग्णाची सेवा करुन कोविड - १९ संकटात जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असलेल्या आरोग्य सेवकाचे मागील दोन महिन्याचे वेतन शासन दरबारी रखडल्याचे वृत्त संगमनेर लाईव्ह ने मंगळवारी (दि. ५ ऑक्टोबर) ऑनलाइन प्रसिद्ध करुन आरोग्य कर्मचाऱ्याची बाजू मांडली होती. त्यानतंर अवघ्या काही तासात मंगळवारी आरोग्य कर्मचाऱ्याना एक महिन्याचे वेतन वर्ग करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यानी संगमनेर Live परिवाराचे आभार मानले आहे.
अहमदनगर जिल्हापरिषदे अतंर्गत जिल्ह्यात ५५५ आरोग्य केद्रं व ९६ प्राथमिक आरोग्य केद्रं असून यामध्ये सुमारे १५०० आरोग्य कर्मचारी कार्यरत असल्याने त्याच्यावर पंधराशे कुटुंब अवलंबून आहेत. मागील दोन वर्षापासून या कर्मचाऱ्याचे पगार वेळेवर होत नाहीत, झाले तर दोन - दोन महिने उशीराने होतात. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी याना याबाबत पाठपुरावा केला असता त्यानी याबाबत लवकरचं निर्णय घेण्याचे आश्वासन आरोग्य सेवकाना दिले होते.
मात्र महिना उलटला तरी कर्मचाऱ्याचे मागील दोन महिन्यापासूनचे पगार झाले नव्हते. त्यामुळे पंधराशे कुटुंबावर अर्थिक संकट कोसळल्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्या कर्मचाऱ्याना आपल्या पाल्याच्या शैक्षणिक गरजा, बँक कर्जाचे हप्ते, कुटुंबातील व्यक्तीचे आजारपण व औषध उपचार याबाबत मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे शासनाने आरोग्य कर्मचाऱ्याचे पगार नियमित करावेत व जिल्हापरिषद प्रशासनाने त्यासाठी पाठपुरावा करावा याचे वास्तव चित्र जिल्हाध्यक्ष डिसले व आरोग्य सेवकानी दिलेल्या माहितीच्या आधारे माडंले होते.
दरम्यान हे वृत्त संगमनेर लाईव्हवर ऑनलाइन प्रसिद्ध होताचं प्रशासनाने मंगळवारी तात्काळ आरोग्य कर्मचाऱ्याचे एक महिन्याचे वेतन त्यांच्या खात्यावर वर्ग केले. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर डिसले याच्यासह जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यानी संगमनेर Live परिवाराचे आभार माणून न्याय मिळवून दिल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.