◻ १५०० कोरोना योध्दयाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ.
संगमनेर Live | मागील दिड वर्षापासून आहोरात्र कोरोना बाधीत रुग्णाची सेवा करुन कोविड - १९ संकटात जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असलेल्या आरोग्य सेवकाना मागील दोन वर्षापासून मोठ्या अर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मागील दोन महिन्याचे पगार शासन दरबारी थकीत असल्याने या आरोग्य कर्मचाऱ्यानवर उपासमारीचे वेळ आल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर डिसले यानी दिली आहे.
याबाबत डिसले यानी माहिती देताना सांगितले की, अहमदनगर जिल्हापरिषदे अतंर्गत जिल्ह्यात ५५५ आरोग्य केद्रं व ९६ प्राथमिक आरोग्य केद्रं असून यामध्ये सुमारे १५०० आरोग्य कर्मचारी कार्यरत असल्याने त्याच्यावर पंधराशे कुटुंब अवलंबून आहेत. मागील दोन वर्षापासून या कर्मचाऱ्याचे पगार वेळेवर होत नाहीत, झाले तर दोन - दोन महिने उशीराने होतात. त्यामुळे आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी याना याबाबत पाठपुरावा केला असता त्यानी याबाबत लवकरचं निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र महिना उलटला तरी कर्मचाऱ्याचे मागील दोन महिन्यापासूनचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे पंधराशे कुटुंबावर अर्थिक संकट कोसळले आहे. उपासमारीची वेळ आलेल्या कर्मचाऱ्याना पाल्याच्या शैक्षणिक गरजा, बँक कर्जाचे हप्ते, कुटुंबातील व्यक्तीचे आजारपण व औषध उपचार याबाबत मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याने शासनाने आरोग्य कर्मचाऱ्याचे पगार नियमित करावेत व जिल्हापरिषद प्रशासनाने त्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डिसले यानी केली आहे.
काही कारणास्तव पगार प्रक्रीयेला अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहचवून पगार लवकर व्हावेत यासाठी पाठपुरावा सुरु असून लवकरचं वेतनाचा मुद्दा निकाली काढण्यात येईल.असे जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. संदीप सांगळे यानी संगमनेर लाईव्हशी बोलताना सांगितले.
दिड वर्षापासून कोरोना संकटात सर्वाना सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य विभागाचे कोरोना योध्ये जीवाची बाजी लावत २४ तास आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्याचे पगार रखडल्यामुळे मोठ्या अर्थिक अडचणीचा सामना त्याना करावा लागत असल्याने उसनवारी करुन प्रपंच चालवावा लागत आहे. त्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना कर्मचाऱ्यानमध्ये निर्माण झाली असून शासन व प्रशासनाने कर्मचाऱ्याचे रखडलेले पगार नियमित करुन आधार द्यावा ही आमची मागणी आहे. असे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र आरोग्य कर्मचारी संघटना अहमदनगर चे मनोहर डिसले यानी म्हटले आहे.