संगमनेर Live | संगमनेर व प्रवरानगर येथील साखर कारखाने सुरु झाल्यामुळे इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ऊस तोडणीसाठी मजुंर कुटुंबासमवेत संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरात दाखल झाले आहेत. याचं कुटुंबातील लहान मुलाना सामाजिक बाधीलकीतून मांचीहिल शैक्षणिक संकुलनातील ८ वी च्या विद्यार्थ्यानी स्वेटर, पाणी व खाऊचे वाटप केल्यामुळे या विद्यार्थ्यानचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मांचीहिल शैक्षणिक संकुल आपल्या विविध उपक्रमासाठी सदैव चर्चेत असते. यातील ८ वी इयत्तेत शिकाऱ्या विद्यार्थ्यानी प्रवरा उजव्या कालव्यालगत नुकत्याच दाखल झालेल्या ऊस तोड मजुंराच्या मुलाना स्वेटर, पाणी व खाऊचे वाटप केले.
यासाठी विद्यार्थ्याना प्राचार्य विजय पिसे, जेष्ठ शिक्षिका सौ. शितल सांबरे, वर्गशिक्षका सौ. जयश्री जोधंळे, शिक्षक देविदास वाळेकर आदिनी मार्गदर्शन केले. दरम्यान यावेळी या मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता.