संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील हगेंवाडी येथिल अतिशय गरीब कुटुंबातील व हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील संजय श्रीकिसन मोरे याला नुकताच रोजनदारीचे काम करत असताना पक्षघाताचा जोरदार धक्का बसला होता. त्यामुळे औषध उपचाराच्या खर्चाचा मोठा प्रश्न उभा राहिला असता गावातील मित्रपरिवार व काही ग्रामस्थ हे मोरे याच्या अर्थिक मदतीसाठी धावून आल्यामुळे मोरे याच्यावर योग्य उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, संजय मोरे हे मन मिळाऊ व सु स्वभावासाठी गावात परिचित आहेत. त्यामुळे त्यानी मोठा मित्रपरिवार जोडला आहे. नुकतेच रोजनदारीचे काम करत असताना रक्तदाब वाढल्याने त्याना पक्षघात धक्का बसला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता पैशाची गरज निर्माण झाली होती. परंतु घरची परिस्तिथी अतिशय नाजूक असल्याने दवाखान्याचा खर्च करणे शक्य नव्हते.
ही माहिती गावात समजताचं मोरे याच्या गावातील मित्रानी सोशलमिडीयाच्या माध्यमातून मुंबई व पुण्यातील मित्राना कळवली. माहिती मिळताचं सर्व मित्रानी एका दिवसात ६० हजाराची मदत जमा करुन ती उपचारासाठी दिल्यामुळे संजय मोरे यांचेवर योग्य उपचार सुरु झाल्याने मोरे यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान या सर्व उपक्रमासाठी गावातील अनिल वसंत कांगणे, अरुण देमाजी सांगळे, महेंद्र भिवराज सांगळे, मुबंई येथिल रविंद्र राजाराम कांगणे, पुणे येथील राम सुकदेव कांगणे यांनी विशेष परिश्रम घेतले असून यासाठी रमेश सांगळे व राजेंद्र कांगणे यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे आजारी मित्राच्या मदतीला मित्र धावून आल्याची चर्चा हगेंवाडी परिसरात सुरु आहे.