शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड व गृह राज्यमंत्री सतेज पाटील शनिवारी संगमनेरमध्ये.

संगमनेर Live
0
नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात याच्या अध्यक्षतेखाली होणार उद्घाटने.

संगमनेर Live | सततच्या विकास कामांमधून राज्यात वैभवशाली व अग्रगण्य ठरलेल्या संगमनेर शहरात नगरपरिषदेच्या वतीने शनिवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. राज्याच्या शिक्षण मंत्री ना. प्रा. वर्षाताई गायकवाड, गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आ डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यमार्ग क्रमांक ५० वरील संगमनेर ते समनापुर रस्ता चौपदरीकरण व सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन व रमाई उद्यान उद्घाटन सोहळा यांसह विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शहराच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगर परिषदेने सातत्याने विविध विकास कामे राबवली आहेत. नागरिकांचा सहभाग व सततची विकास कामे यातून संगमनेर नगरपरिषदेच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. शहरातील वैभवशाली इमारती, विविध रस्त्यांचे जाळे, नागरिकांना आरोग्याच्या सुविधा, मुबलक व स्वच्छ पाणी, विविध गार्डनची निर्मिती यांचेसह अनेक विकासकामे राज्यासाठी मार्गदर्शन ठरले आहेत. 

शनिवार दिनांक २५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड, गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन व रमाई उद्यान उद्घाटन सोहळा तसेच संगमनेर ते समनापुर रस्ता चौपदरीकरण व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन होणार आहे.

याप्रसंगी प्रतिथयश उद्योगपती राजेश मालपाणी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात यांचेसह संगमनेर तालुका व शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !