◻ सहा शेतकऱ्याचे अंदाजे ७ ते ८ लाख रुपयाचे नुकसान.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील प्रतापपूर शिवारात शुक्रवारी दुपारी विजेच्या खांबावर शॉट सर्कीट झाल्यामुळे येथिल सहा शेतकऱ्याचा अंदाजे ६ एकर जळून खाक झाला. यावेळी स्थानिक तरुणानी दाखवलेल्या प्रसंगसावधानतेमुळे पुढील ५० एकर ऊस या अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्रतापपूर शिवारातील ऊस क्षेत्रात विजेच्या खांबावर शॉट सर्कीट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे गावातील जेष्ठ नेते भगवानराव इलग यानी खात्री करुन पद्मश्री डॉ. विखे पाटील साखर कारखाण्याचे संचालक कैलास तांबे व शेतकीचे मुख्य अधिकारी चेचरे याना याबाबत माहिती कळवून घटनास्थळी तात्काळ अग्निशामक बंब पाठवण्याची विनंती केली. तर भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील याचे स्विव साहय्यक प्रमोद रहाणे व बापुसाहेब गायकवाड याना ही घटनेचे गांभिर्य कळवण्यात आले. त्यामुळे आवघ्या काही वेळात यंत्रणा हालल्यामुळे विखे पाटील कारखाण्याचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळाकडे रवाना झाले.
याकाळात अग्नीने रौद्र रुप धारण केल्यामुळे मोठ्याप्रमाणात ऊसाचे क्षेत्र नेस्त नाबूत करत होती. त्यामुळे गावातील शिवाजीराव भगवानराव इलग, श्रीधर शंकर आंधळे, बाळासाहेब एकनाथ आंधळे, किरण लक्ष्मण आंधळे, दिलिप सोमनाथ आंधळे, कचेश्वर सखाराम आंधळे, सतिष शंकर आंधळे, शंकर गोधाजी सांगळे, तुषार आंधळे आदी तरुणानी घटनास्थळी हजर होत आगीचे लोळ विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. याचकाळात पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखाण्याचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे काही वेळात आगीवर नियत्रंण मिळवल्याने पुढील ५० एकर ऊस जळण्यापासून वाचवण्यात यश आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
दरम्यान या आगीमध्ये बाळासाहेब एकनाथ आंधळे याच्या गट नं १०२ मधील ४० आर, सुजाता बाळासाहेब आंधळे याचा ३० आर, रामभाऊ बाबुराव आंधळे यांचा ४० आर, किरण लक्ष्मण आंधळे याचा ५३ आर, तसेच दादा सखाराम इलग यांच्या गट नं ११० मधील ६३ आर व कैलास सोमनाथ आंधळे याच्या गट नं १०४ मधील १० आर ऊस जळून खाक झाल्यामुळे या शेतकऱ्याचे अंदाजे ७ ते ८ लाख रुपयाचे अर्थिक नुकसान झाले आहे.