◻ ओझर खुर्द येथे ना. थोरात गटाच्या उमेदवाराच्या पाठिब्यामुळे आ. विखे गटाचा विजय सुकर.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक व ओझर खुर्द येथे प्रत्येकी एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणूकीत आ. विखे पाटील याचे मार्गदर्शनाखालील जनसेवा मंडळाच्या उमेदवारानी दोन्ही ठिकाणी निर्णायक मते घेऊन विजय मिळवला असला तरी ओझर खुर्द येथे ना. थोरात याच्या गटाने गावपण जपण्यासाठी जनसेवा मंडळाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे आ. विखे गटाच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला आहे.
आश्वी बुद्रुक व ओझर खुर्द येथे ग्रामपंचायत सदंस्य पदाची एक जागा रिक्त झाल्याने मंगळवारी पोटनिवडणूकीची मतदान प्रक्रिया व बुधवारी मतमोजणी प्रकिया शांततेत पार पडली. स्थानिक कार्यकर्त्याची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे आश्वी बुद्रुक येथील निवडणूक अतिशय अटीतटीची झालेली पाहवयास मिळाली. यामध्ये भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील याचे मार्गदर्शनाखालील जनसेवा मंडळाच्या शंकुतला सुरेश गायकवाड याना ३३७ मते पडल्याने प्रतिस्पर्धी उमेदवार आम्रेश्वर विकास मंडळाच्या मीराबाई भास्कर गायकवाड (३१३ मते) याचा तब्बल २३ मतानी पराभव झाला. याठिकाणी १५ मते ही नोटाला पडली आहेत. विशेष म्हणजे आश्वी बुद्रुक येथिल ग्रामपंचायतीवर ना. बाळासाहेब थोरात गटाची सत्ता असतानाही त्याना पराभवाचा सामना करावा लागल्याने हा पराभव त्याच्या जिव्हारी लागला असल्याचे चित्र आहे. तर या विजयामुळे आ. विखे पाटील गटाचे आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीत आता दोन सदंस्य आसणार आहेत.
ओझर खुर्द येथे जनसेवा मंडळाच्या उमेदवार सोनाली संदिप शेजुळ यानी २२३ मते मिळवून थोरात गटाच्या उमेदवार अपर्णा सोमनाथ थोरात (१३ मते) याचा २१० मतानी पराभव केला असून याठिकाणी नोटाला ४ मते पडली आहेत.
दरम्यान ओझर खुर्द येथे ना. बाळासाहेब थोरात याच्या जेष्ठ कार्यकर्त्यानी गाव विकासासाठी एकत्र येऊन गावपण जपण्याचा निर्णय घेतला. परंतू अर्ज माघारीला उशीर झाल्याकारणाने थोरात गटाच्या सौ. अपर्णा थोरात यानी जेष्ठ स्थानिक कार्यकर्त्याच्या सहमतीने जनसेवा मंडळाच्या उमेदवार सोनाली शेजुळ यांना जाहिर पत्रक काढून पाठिबां दिला. त्यामुळे आ. विखे पाटील गटाच्या उमेदवाराने या पोटनिवडणूकीत एकहाती बाजी मारली असून यातून ओझर खुर्द ग्रामस्थानी राजकारणाऐवजी विकास कामाना प्राधान्य देण्यावर भर दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
ओझर खुर्द गावाने नेहमी राजकारणाऐवजी विकासकामाना प्राधान्य दिले आहे. नुकत्याच पार पडलेली सेवा सोसायटी निवडणूक ही सर्व सहमतीने बिनविरोध केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्याच्या वाटाघाटी सुरु होत्या. मात्र अर्ज माघारीच्या दिवशी उशीर झाल्याने उमेदवारी अर्ज राहिला असला तरी आमच्या उमेदवाराने जाहिर पत्रक काढून पाठिबां देण्यात गावचे जेष्ठ नेते दिलिपराव शिदें यानी महत्वाची भूमिका बजावल्यामुळे जनसेवा मंडळाच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
पुंजाहरी शिदें, सरपंच ओझर खुर्द