संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक व ओझर खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया मंगळवारी शांततेत पार पडली असून उद्या बुधवारी संगमनेर तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असला तरी आश्वी बुद्रुक येथिल पोटनिवडणूक ना. थोरात व आ. विखे पाटील गटाच्या कार्यकर्त्यानी प्रतिष्ठेची केल्यामुळे या निवडणूक निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आश्वी बुद्रुक व ओझर खुर्द येथे प्रत्येकी एक जागा रिक्त झाल्याने मंगळवारी पोटनिवडणूकीसाठीची मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली. आश्वी बुद्रुक येथिल पोटनिवडणूक आ. विखे पाटील व ना. थोरात गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यानी प्रतिष्ठेची केल्यामुळे मागील आठ दिवसापासून दोन्ही गटातील कार्यकर्ते व उमेदवारानी ५ नबंर वार्ड पिजूंन काढला होता.
मंगळवारी दोन्ही गटाचे जेष्ठ कार्यकर्ते व तरुण सहकारी जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावत होते. आश्वी बुद्रुक येथे ९०७ मतदारापैकी ६६५ मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने ७३.३२ टक्के मतदान झाले. ओझर खुर्द येथे ४६५ मतदारापैकी अवघ्या २४० मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने ५१.६१ टक्के मतदान झाले आहे.
दरम्यान उद्या बुधवारी संगमनेर तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. आवघ्या ६ महिन्यानतंर ऐऊन ठेपलेल्या मुख्य निवडणूकीची ही पोटनिवडणूक रंगीत तालीम असल्याने दोन्ही गटाच्या स्थानिक कार्यकर्त्याची प्रतिष्ठा पणाला लागल्याने उद्याच्या निकालाकडे जिल्हाचे लक्ष लागले आहे.
***नोकरी जाहिरात***
🙏 पाहिजे.... पाहिजे.... 🙏
संत गोरोबा इलेक्ट्रीक्स दाढ खुर्द साठी Camputar व Tally चे ज्ञान तसेच किमान १ वर्षाचा अनुभव असलेले स्री अथवा पुरुष नोकरीसाठी भरणे आहे.
📍 जागा - १
📱 संपर्क :- 9552536150