◻ कोणी ओळखत असल्यास आश्वी पोलीसाशी संपर्क करण्याचे आवाहन.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी शिवारातील शेतामध्ये रविवारी सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून या व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास आश्वी पोलीसाशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुभाष भोये यानी केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास लोणी - संगमनेर महामार्गावरील निमगावजाळी शिवारातील श्रीरंग संभाजी वदक याच्या गट नंबर १०/३८ मधील हरभरा पिकात ४०ते ४५ वय असलेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती कामगार पोलीस पाटील दिलिप डेगंळे यानी आश्वी पोलीस स्टेशनला कळवली होती. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुभाष भोये व त्याच्या सहकाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी हवालदार आर. बी. भाग्यवान, दैमिवाळ, पोलीस पाटील दिलिप डेगंळे तसेच साहेबराव खरात, बाळासाहेब कोल्हे, मनोज आरगडे, बाबासाहेब डेगंळे आदि स्थानिकाच्या मदतीने मृतदेह पुढील कारवाईसाठी संगमनेर येथिल रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. बी. भाग्यवान हे पुढील तपास करत आहे.