◻ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कानवडे यांची माहिती.
संगमनेर Live | राजमाता जिजाऊ यांचा ४२४ वा जन्मोत्सव सोहळा राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथिल शहागडावर सकाळी ९ वा. साध्यापध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. कोरोना आपत्तीचे सावट दिवसेंदिवस गडद होत असल्याने सर्व मावळ्यांनी या जन्मोत्सव सोहळ्यासाठी शासकीय नियमाचे पालण करत उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कानवडे यानी केले आहे.
पेमगिरी येथिल शहागडावर जिजाऊ जन्मोत्सव साध्यापणाने साजरा होणार आहे. यावेळी महानंदा तसेच राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख याच्या हस्तें मॉ साहेब जिजाऊच्या प्रतिमेचेपुजन केले जाणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सरपंच सोमनाथ गोडसे भुषवणार आहेत.
जिल्हापरिषद सदंस्य रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, जिल्हा मंजूर फेडरेशनचे संचालक नानासाहेब कानवडे, छावाचे जिल्हासंपर्क प्रमुख दिनकर घुले, जिल्हा सरचिटणीस संजय गायकवाड, तालुकाध्यक्ष गणेश गुंजाळ, उपाध्यक्ष बाळासाहेब कानवडे, अजय गुंजाळ, निलेश म्हस्के, सतिष कानवडे, संजय शिरतार, पेमगिरीच्या सरपंच द्वारकाताई डुबे, उपसरपंच खंडू जेडगुले, आदिसह परिसरातील शिवभक्त व मावळे यावेळी उपस्थित राहणार आहे.
दरम्यान कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सर्व सोहळ्यांना शासनाने परवानगी नाकारल्यानंतर लक्षावधी जिजाऊ भक्तांचा हिरमोड झाला असला तरी सर्व शासकीय नियमाचे पालन करत राजमाता जिजाऊना अभिवादन केले जाणार असल्याचे राष्ट्रीय छावा संघटनेने स्पष्ट केले असून मास्क, सैनिटायझर व योग्य अतंर ठेवून शिवभक्ताना उपस्थित राहण्यास सांगितले आहे.