संगमनेर Live | मराठा समाजाची दिशाभूल करणाऱ्या सरकारला भानावर आणण्यासाठी छत्रपती संभाजीराजे मुंबई येथील आझाद मैदानावर अन्नंत्याग आदोंलन करणार असून राष्ट्रीय छावा संघटना व छावा क्रांतिवीर सेनेचे हजारो कार्यकर्ते खा. संभाजी राजें छत्रपती याना पाठीबा देण्यासाठी जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रवीण कानवडे यानी दिली आहे.
मराठा समाजाच्या राज्य सरकारच्या आख्यारित असलेल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी उद्या २६ फेब्रुवारी रोजी खा. संभाजीराजे छत्रपती हे आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. महाराष्ट्र घडवणाऱ्या छत्रपतीच्या वशंजाना त्याच मातीवर रयतेचे हक्क पदरात पाडून घेण्यासाठी उपोषणाला बसण्याची वेळ येणे, यासारखे दुसरे दुर्दैव नसल्याची भावना मराठा समाजामध्ये निर्माण होत असल्याचे प्रवीण कानवडे यानी म्हटले आहे.
जनतेला वेठीस धरायचे नाही म्हणून खा. संभाजीराजे छत्रपती हे एकटे उपोषणाला बसणार असले तरी राष्ट्रीय छावा संघटना व छावा क्रांतिवीर सेनेचे हजारो कार्यकर्ते त्याच्याबरोबर उपोषणाला बसणार असून खा. संभाजीराजे छत्रपती याना पाठिबा देण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रवीण कानवडे, छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे, तालुकाध्यक्ष गणेश थोरात, उपाध्यक्ष सचिन गांजवे, संजय गायकवाड, देवा लोखंडे, शरद गिरीराज, कृष्णा चौधरी, गणेश गुंजाळ, अनिल जाधव, दिनकर घुले अजय गुंजाळ आदिनी दिली आहे.