◻ मध्यप्रदेशात येथे झाला अपघातात ; सहकारीही गंभीर जखमी.
◻ बिहार येथे मृत व्यक्त्तीचे पार्थिव शरीर सोडून येत असताना परतीच्या प्रवासात झाला अपघात
संगमनेर Live | मध्यप्रदेशात एक अज्ञात वाहन व रुग्णवाहिका यांचा भिषण अपघात झाला होता. या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक अनिल शिवाजी बर्डे (वय - ३७, रा. पानोडी, ता. संगमनेर) जागीच ठार झाला असून त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी रात्री घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोणी येथिल रुग्णालयातून एक मृत्यू झालेल्या व्यक्तीचा पार्थिव देह घेऊन बिहार येथे अब्युलेन्स चालक अनिल शिवाजी बर्डे हे आपल्या सहकाऱ्यासमवेत गेले होते.
यावेळी परतीचा प्रवास सुरु असताना सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश येथिल सुगी या परिसरात वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याना जोरदार धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेचे चालक अनिल बर्डे याचा जागीचं मृत्यू झाला व त्याचा सहकारी गंभीररित्या जखमी झाला तर रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान दिवगंत अनिल बर्डे यांची घरची परिस्थिती अत्यत हलाखीची असून सर्व कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. बुधवारी सकाळी अनिल बर्डे याच्य पार्थिव देहावर पानोडी येथे शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार झाले असून त्याच्या अकस्मित निधनामुळे पानोडी सह पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.