भाजपा नेते आ. विखे पाटील यांच्याकडून संगमनेर आगारातील ३०० एसटी कामगारांना किराणा किट

संगमनेर Live
0

स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किराणा किटचे वितरण 

१०५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण राज्यात दुखवटा आंदोलन सुरु

मात्र सरकारचे वेळकाढू धोरण कामगारांच्या मुळावर - सोमनाथ कानकटे

संगमनेर Live | १०५ दिवसांपासून एसटी महामंडळातील कामगारांनी सुरु ठेवलेल्या दुखवटा आंदोलनाला पाठबळ म्हणून भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर आगारातील ३०० कामगारांना किराणा किट उपलब्ध करुन दिले. संगमनेर बस स्थानकाच्या आवारात स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या किराणा किटचे वितरण कर्मचाऱ्यांना करण्यात आले.
 
सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी १०५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यात दुखवटा आंदोलन सुरु ठेवले आहे. अहमदनगर जिल्हयातही हे आंदोलन सुरु ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या तसेच सेवा समाप्तीच्या कारवाया महामंडळाकडून करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिकदृष्ट्या मोठी अडचण झाली आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे.

यासर्व कामगारांच्या आंदोलनास भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पाठींबा देवून शेवटच्या कामगाराला न्याय मिळेपर्यंत तुमच्या सोबत असल्याची ग्वाही वेळोवेळी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर दिली होती. न्यायालयीन लढाईसाठीही आ. विखे पाटलांनी कामगारांना सर्वोतोपरी मदतही केली आहे. कामगारांचे पगारही आता बंद झाल्याने कर्मचाऱ्यांचे व त्यांचे कुटूंबियाचे हाल होत आहेत. या परिस्थितीची जाणीव ठेवून विखे पाटील परिवाराच्यावतीने उत्तरनगर जिल्ह्यातील एसटी कामगारांना किराणा किटचे वितरण करण्यात आले आहे.

संगमनेर आगारातील ३०० कामगारांना आज हे किराणा किट वितरीत करण्यात आले. याप्रसंगी बोलताना कामागार संघटनेचे पदाधिकारी सोमनाथ कानकटे म्हणाले की, आमच्या न्याय मागण्यासाठी लढा सुरू आहे. मात्र सरकारचे वेळकाढू धोरण कामगारांच्या मुळावर उठले असून राज्यात एसटी कामगारांनी आत्महत्या केल्यातरी या सरकारला कोणत्याही संवेदना नसल्याची टिका करुन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने आमच्या लढ्यास पाठबळ दिल्याने आमचे धैर्य वाढत आहे. आमच्या परीवाराला केलेली मदत खूप महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
 
भाजपा शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी आघाडी सरकारच्या धोरणावर टिका करून दुकानांमधून वाईन विकण्याचा निर्णय करणारे सरकार एसटी कामगारांच्या मागण्यांवर  निर्णय करू शकत नसल्याचे दुर्दैव असल्याचे सांगितले.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष डॉ. अशोक इथापे यांनी तीन पक्षाच्या सरकारला त्यांचेच काय चालले हे कळायला तयार नाही. तुमचा लढा १०५ दिवसांपासून सुरू आहे यातच तुम्ही जिंकला मात्र अंतिम लढ्यासाठी आम्ही आ. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदैव तुमच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. भागवान गीते किसान मोर्चाचे सतिष कानवडे यांच्यासह अनेकांनी या आंदोलनाला पाठींबा व्यक्त केला. 

यावेळी डॉ. अशोकराव इथापे, अँड. श्रीराम गणपुले, सतीषराव कानवडे, डॉ. सोमनाथ कानवडे, सौ. सुनिताताई कानवडे, मेघाताई भगत, राम जाजू, राजेंद्र सांगळे, दिपक भगत, हरीश्चंद्र चकोर, शिरीष मुळे, अमोल खताळ, साहेबराव वलवे, कैलास भरीतकर, सौ. पुजा दिक्षीत, सुनिता खरे, जावेदभाई जहागीरदार, राजेश चौधरी, संदीप देशमुख, डॉ.महेंद्र कोल्हे, रोहित चौधरी, वैभव लांडगे, गणेश सानप, शैलेश फटांगरे, कृपाल डंग, संपत गलांडे, विनायक थोरात, शिवाजी आहेर, नवनाथ वावरे, अशोक नन्नवरे, सोपानराव राऊत, शशांक नामन, स्वप्निल वाबळे, सहदेव जाधव, सुशांक वर्पे, सिताराम मोहरीकर, सुनिल खरे यांसह कार्यकर्ते तसेच संगमनेर आगारातील एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !