◻ नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यानी निवेदन स्विकारले.
◻ केंद्र सरकार विरोधात कॉग्रेस कार्यकर्त्याची घोषणाबाजी
संगमनेर Live | कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने अत्यंत चांगले काम केले असून या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. संसदेमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा सन्मान करण्याऐवजी केलेले अवमानकारक वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असून या वक्तव्याचा संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करण्यात आला.
प्रांताधिकारी कार्यालय येथे संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने या वक्तव्याच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, जिल्हापरिषद सदस्य रामहरी कातोरे, गटनेते अजय फटांगरे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई बालोडे, सौ. प्रमिलाताई अभंग, सेवादलाचे सुरेश झावरे, तात्या कुटे, जावेद शेख, बाळासाहेब कानवडे, प्रा. बाबा खरात आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या संकटात अत्यंत चागले काम केले असून हे काम इतरांना दिशादर्शक ठरले आहे. देशामध्ये सध्या वाढलेली महागाई, बेरोजगारी यावर बोलण्याऐवजी पंतप्रधानांनी काल संसदेमध्ये महाराष्ट्राचे अवमानकारक करणारे वक्तव्य केले ते अत्यंत निंदनीय असून आम्ही याचा निषेध करत आहोत
यावेळी बोलताना सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, देशात महाराष्ट्र पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांच्या या महाराष्ट्राने कायम देशाला एकात्मतेचे विचार दिले आहे. खरेतर कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राने केलेल्या कार्याचा संसदेमध्ये सन्मान होणे गरजेचे होते. मात्र पंतप्रधानांनी कोरोना वरून महाराष्ट्राबद्दद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्या म्हणाल्या.
बाबा ओहोळ म्हणाले की, कोरोना संकटात काँग्रेस पक्षाने परप्रांतीय मजुरांना अत्यंत चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारने हे अत्यंत चांगले काम केले आहे. खा. राहुल गांधी यांनी कोरोनाच्या संकटाची चाहूल केंद्र सरकारला दिली होती.
मात्र केंद्र सरकारने या सूचनांकडे दुर्लक्ष केले आणि त्याचे मोठे परिणाम देशाला भोगावे लागले. पंतप्रधानांनी महाराष्ट्र द्वेष ठेवून केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचेही ते म्हणाले. हे निवेदन नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांनी स्वीकारले दरम्यान यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या आहेत.