◻ आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत आयोजित विविध विकास कामाचे भुमीपुजन.
स्मारक उध्दघाटनासाठी ना. रामदास आठवले येणार..
संगमनेर Live | महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविधानामुळे मागसवर्गीय समाज, आदिवासी व महीलासह सर्व सामान्य माणसाला राजकिय प्रवाहात येवून काम करण्याची सुवर्ण संधी मिळाली. राजकिय, सामाजिक, धार्मिक व व्यावसायिक दृष्ट्या संप्रन्न असलेल्या आश्वी सारख्या गावात मागसवर्गिय समाजातील तरुण संरपच पदाला न्याय देताना सर्व समाज घटकाना बरोबर घेवून विकासाची घोडदौड सुरु नव्हे तर पुर्णत्वाकडे नेत असल्याचे चित्र हे अभिमानास्पद असल्याचे गौरोद्गगार रिपाईचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी काढले आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे ग्रामपंचायतीकडून शौर्यस्तंभ व विविध विकास कामाचे भुमिपुजन संभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतान सुरेंद्र थोरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे होते.
विभागीय जिल्हाध्यक्ष भिमा बागुल, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुनिल शिरसाठ, संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके, युवक तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोडे, शहराध्यक्ष कैलास कासार, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रुपाली सोनवणे, तुषार दिवे, करण कोळगे, संरपच महेश गायकवाड, उपसंरपच राहुल जऱ्हाड, प्रशांत कोळपकर, गिताराम गायकवाड, प्रविण गायकवाड, संदीप गायकवाड, सुरेश मदने, अण्णा जऱ्हाड, सागर गायकवाड, जना साळवे, अँड. रवी शेळके, उल्हासराव गायकवाड, पापा शेख, अस्लम शेख, आदिसह मोठया संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, आश्वी बुद्रुक सारख्या मोठ्या गावात शौर्यस्तंभ होणे म्हणजे भाग्य असून एका बाजूला राम मंदिर, दुसऱ्या बाजूला जैन स्थानक व चर्च तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात शौर्यस्तंभ होणार असल्याने याठिकानी जातीय सलोखा हा पिढ्यानं - पिढ्या टिकणार आहे. युवानेते विजयराव हिंगे, संरपच, उपसंरपच व सदस्यांनी निस्वार्थीपणे गावात विकास कामाची घोडदौड सुरु केल्याने गावाचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे.
उध्दघाटनासाठी ना. आठवले येणार..
आश्वी येथील शौर्यस्तंभाच्या उध्दघाटनासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले येणार असून भविष्यात या जागेला जातीय सलोख्यामुळे वलय निर्माण होईल असा विश्वास उपस्थितानी व्यक्त केला. दरम्यान होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पचायत समितीसह येणाऱ्या विधानसभेतही रिपब्लिकन पक्षाचा प्रतिनिधी राहणार असल्याचे रिपाईच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.