◻स्थानिकासह ऊसतोड मजुंरही धावले मदतीला
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात बुधवारी दुपारी शॉट सर्किटमुळे ३ ते ४ एकर ऊसासह ५० ते ६० डाळीबाची जळाल्यामुळे स्थानिक शेतकऱ्याचे ५ ते ६ लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
सादतपूर शिवारात दादासाहेब मोहन मगर याची गट नंबर १७७/१, सौ. भागीरथी बाबासाहेब मगर याची गट नंबर १६२, निलेश भागवत मगर याची गट नंबर २०९ मध्ये ऊसाची शेती आहे. तसेच भाऊसाहेब कारभारी मगर याची गट नंबर १७३/२ मध्ये ऊस शेती व ५० ते डाळिंब झाडे आहेत.
बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास महावितरणच्या खांबावर शॉट सर्किट झाल्यामुळे आग लागली. उन्हामुळे आगीने उग्रं रुप धारण करत ऊसाचे क्षेत्र बेचीराख करण्यास सुरवात केली. जवळचं ऊस तोड सुरु असल्याने ऊस तोड मजुंरानी तिकडे धाव घेत मिळेल त्या वस्तूने आग विझवण्याचा प्रयत्न केला. तर धुराचे लोळ नरजरेस पडल्याने स्थानिक नागरीक व शेतकऱ्यानी घटनास्थळी येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केले.
यावेळी माहिती मिळताच पद्मश्री विखे पाटील कारखान्याचा अग्निशमन बंब ही घटनास्थळी दाखल झाला. राजेद्रं बाबासाहेब मगर, कचरु मोहन मगर, निलेश भागवत मगर आदिसह तरुणानी दाखवलेल्या प्रसंगसावधानतेमुळे काही तासानतंर आग आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी पोलीस पाटील सुनील मगर यानी महावितरणच्या लोणी कार्यालय तसेच स्थानिक कामगार तलाठी याना माहिती कळवली आहे.
दरम्यान अचानक लागलेल्या या आगीमुळे दादासाहेब मगर, सौ. भागीरथी मगर, निलेश मगर, भाऊसाहेब मगर या शेतकऱ्याचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यानी नाराजी व्यक्त केली आहे.