◻ कालवाडीचे उत्कृष्ट संगोपन करणाऱ्या शेतकऱ्याचा पुरस्कांर देऊन गौरव
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापुर येथे कामधेनु दत्तक ग्राम योजने अंतर्गत पंचायत समिती संगमनेर व पशुसंर्वधन विभागामार्फत पशुसर्वधन विषयक शिबिर व संकरित वासराचा मेळावा मोठ्या उत्साही वातावरणात शनिवारी सकाळी पशुपालक व शेतकऱ्याच्या उपस्थितीत श्री संकटेश्वर महादेव मंदिर प्रागंणात पार पडला आहे.
यावेळी आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानी कामधेनु दत्तक ग्रामयोजनेचे अध्यक्ष अशोक भुसाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती संदस्या स्वातीताई मोरे, माजी पंचायत समिती संदस्य सरुनाथ उंबरकर, उद्योजक विलास उंबरकर, सरपंच किरण भुसाळ, उपसरपंच नानासाहेब उंबरकर, प्रवरा कारखाण्याचे माजी संचालक भागवत उंबरकर, निझर्णेश्वर लिफ्टचे चेअरमन बापूसाहेब भुसाळ, ग्रामपंचायत सदस्यं विजय शेळके, नानासाहेब भुसाळ, भिकाजी खेमनर, अशोक उंबरकर, पोलीस पाटील सौ. वैशाली भगवान मैड, पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. आर. शिंदे, ग्रामसेवक किशोर मांढरे, पशुधन पर्यक्षक डॉ. कढने व डॉ. फड उपस्थित होते. यावेळी कामधेनु दत्तक ग्राम योजनेच्या गाडीचे पंचायत समिति स्वाती मोरे व सरपंच किरण भुसाळ यांनी उद्घाटन केले.
याप्रसंगी डॉ. बी. आर. शिंदे यानी उपस्थित पशुपालक व शेतकऱ्याना निकृष्ट चारा सकस करणे, अझोला उत्पादन, गाडूळ खत निर्मिती आदि विषयावर मार्गदर्शन करताना पशुपालकाच्या शंकाचे निरसन केले. तसेच प्रात्याक्षिकाच्या माध्यमातून विविध विषयाची माहिती दिली.
या कार्यक्रमादरम्यान सरुनाथ उंबरकर, सागर दिघे, स्वाती मोरे, विलास उंबरकर व अडवेंटा सीड कंपनीचे कवडे यानी उपस्थिताना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजना पिक व पशु संवर्धनाची इतभुत माहिती दिली.
दरम्यान यावेळी उंबरी बाळापुर गावातील उत्कृष्ट व उत्तम दर्जाच्या कालवाडीचे संगोपन केलेल्या पशुपालक शेतकऱ्याना पंचायत समिति संगमनेरकडून प्रथम, द्वितीय व तृतीय असे ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी व पशुपालकाना १ किलो बियाणे, गोचिंडाचे औषधे व मिनरल मिक्सचरचे मोफत वाटप केले. या कार्यक्रमाचे आभार डॉ. कढने मानले आहेत.