संगमनेर Live| तालुक्यातील सादतपूर शिवारात ४ ते ५ एकर ऊस जळाल्याची घटना ताजी असताना शनिवारी दुपारी पुन्हा महावितरणच्या खांबावर शॉटसर्कीट झाल्यामुळे ६ शेतकऱ्याचा १० ते १२ एकर ऊस जळल्याने या शेतकऱ्याचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत स्थानिक शेतकऱ्यानी महावितरणच्या गलथान कारभारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक करत दिलेली माहिती अशी की, सादतपूर शिवारातील मगर वस्ती येथे सुनंदा नामदेव मगर यांची गट नंबर १९३, लहानभाऊ भाऊसाहेब मगर याची गट नंबर १९६, संतोष तुकाराम मगर यांची गट नंबर १८९, रोहीत रमेश मगर यांची गट नंबर १८८/१, सीताराम कारभारी मगर यांची गट नंबर १८९ ऊसाची शेती आहे. शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास महावितरणच्या खांबावर शॉटसर्कीट झाल्यामुळे उडालेल्या थिनग्यामुळे ऊसाने पेट घेतला. 
आगीचे व धुराचे लोळ उडू लागल्याने घटनास्थळाकडे पोलीस पाटील सुनिल मगर, विनायक मगर, संतोष मगर, संपत गुंजाळ, संजय मगर, शिवाजी मगर, पांडू ठोके, चागदेव कडलग, वैभव मगर, शरद आदिसह मगर वस्तीवरील नागरीकानी धाव घेत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतू आग विझेपर्यत सुनंदा मगर, लहानभाऊ मगर, संतोष मगर, रोहीत मगर, सीताराम मगर या शेतकऱ्याचा तब्बल १० ते १२ एकर ऊस जळून खाक झाल्याने मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.
 

 
   
  