◻ अवघ्या तीन दिवसाच्या अंतराने माय लेकाचा मृत्यू झाल्यामुळे पंचक्रोशीत हळहळ
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल बाबासाहेब हिरामण मुन्तोडे (वय - ५०) यांचे विषबाधा झाल्याने शुक्रवार दि. १८ मार्च रोजी निधन झाले होते. त्यामुळे आपल्या मुलाच्या अकाली निधनामुळे अस्वस्थ झालेल्या मातोश्री छबुबाई हिरामण मुन्तोडे (वय - ६७) याना आपल्या मुलाचा विरह असह्य झाल्यामुळे त्यानीही सोमवार दि. २१ मार्च म्हणजे अवघ्या तिसऱ्या दिवशी देह त्याग केला. या ह्रदय द्रावक घटनेत माय-लेकाच्या मृत्यूमळे पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ऐन उमेदीच्या काळात बाबासाहेब मुन्तोडे यांची कौटुंबिक परिस्थिती हालाखिची असल्याने त्यानी शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाच्या गरजा पुर्ण करण्यासाठी मोलमजुंरी करण्याचा मार्ग स्विकारला होता. पैशाला पैसा जोडत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आवलंब केल्यामुळे त्याना यश मिळत राहिले. यातून त्यानी शेतात पाईपलाईन, मशागतीसाठी ट्रँक्टर आदिची मोठ्या कष्टातून उभारणी केल्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या प्रगतीचा आलेख उचावत चालला होता.
नेहमी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या वरंवडी, हजारवाडी, मालुंजे या गावात सामाजिक दायित्वातून ते नेहमी मोफत टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत असत. अशा या बाबासाहेब मुन्तोडे याना १५ मार्च रोजी शेतात विषबाधा झाली. त्यामुळे उपचारासाठी त्याना लोणी येथिल रुग्णालयात दाखल केले होते. मात्र शुक्रवारी सकाळी १० वा. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आपल्या अंगा खाद्यावर खेळलेल्या आपल्या मुलाचे आकाली निधन झाल्यामुळे छबुबाई मुन्तोडे याना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे मुलाच्या विरहामुळे त्यानी खान्या-पिण्याकडे दुर्लक्ष केले. सदैव मुलाच्या आठवणीने त्या अस्वस्थ होत असल्याने सोमवार दि. २१ मार्च म्हणजे अवघ्या तिसऱ्या दिवशी त्यानी देह त्याग केला.
छबुबाई या मालुंजे येथिल प्रसिद्ध हाडवैद्य त्र्यंबक भागाजी खरात यांच्या कन्या होत्या. आश्वी खुर्द येथिल हिरामण चिमाजी मुन्तोडे यांच्याशी विवाह झाल्यानतंर मोठ्या कष्टातून त्यानी प्रपंच उभा करताना सर्व मुलाना शिक्षणाचे व उच्च विचाराचे बाळकडू संस्कारातून दिले होते. पतीच्या निधनानंतर कुटंबाचा प्रमुख आधार त्या होत्या. परंतू मोठ्या मुलाच्या अकाली निधनाने खचलेल्या छबुबाई यांचे निधन झाले आहे. अवघ्या तीन दिवसाच्या अतंराने माय - लेकाचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईक, मित्रपरिवार व पंचक्रोशीतील ग्रामस्थाकडून हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान बाबासाहेब मुन्तोडे याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ, भावजय व बहीण असा मोठ परिवार असून येथिल प्रा. अनिल मुन्तोडे यांचे ते मोठे बंधू होते.
रविवार दि. २७ मार्च रोजी दिवगंत बाबासाहेब व मातोश्री छबुबाई यांच्या पुण्यानुमोदन व श्रध्दांजली संभेचे सकाळी ८ वा. आश्वी खुर्द येथिल राजगृह सोसायटी मैदान, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रा. अनिल हिरामण मुन्तोडे व आकाश बाबासाहेब मुन्तोडे यानी दिली आहे.