◻ एक अपक्ष उमेदवारी अर्जामुळे नऊ जागासाठी मतदान प्रक्रिया पडली पार
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील नेहमीच सहकार क्षेत्राच्या केद्रंस्थानी राहणाऱ्या शिबलापूर सेवा सहकारी सोसायटीवर भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील याच्या जनसेवा मंडळाने एक हाती सत्ता मिळवत ९ जागा मोठ्या मताधिक्याने तर ४ उमेदवार बिनविरोध निवडून आणत १३-० ने विजय संपादित केला आहे.
शिबलापूर सेवा सोसायटीची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. याआधी विमल शंकर बोद्रें, लक्ष्मीबाई चांगदेव नागरे, चिमाजी भिमाजी मुन्तोडे व अशोक नारायण वालझाडे हे चार उमेदवार बिनविरोध झाले होते. राहिलेल्या ९ जागा बिनविरोध करण्यासाठी गावातील स्थानिक नेत्यानी पुढाकर घेतला. मात्र एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने येथे अखेर निवडणूक प्रक्रिया रविवारी पार पडली.
यावेळी जनसेवा मंडळाचे शिवाजी लिबांजी डोगंरे (२६३), शिवराम मारुती बोद्रें (२६३), राजेद्रं रामचंद्र मांढरे(२४८), विठ्ठल दादा मुन्तोडे (२६१), बाबासाहेब बजाबा म्हस्के (२६१), नंदू नाना रक्टे (२५२), दिलावर अब्दूल शेख (२५२), युन्नुस जमादार शेख ( २४४) व भिमा कारभारी बोद्रें (२५६) हे नऊ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
तसेच विमल शंकर बोद्रें, लक्ष्मीबाई चांगदेव नागरे, चिमाजी भिमाजी मुन्तोडे व अशोक नारायण वालझाडे हे चार उमेदवार बिनविरोध झाल्याने १३-० ने जनसेवा मंडळाने विजय संपादित केला आहे.