◻ रोख रक्कमेसाठी ९ तोळे सोन्या चांदीचे दागीने चोरट्यानी लाबवले
◻श्वान पथकाची घटनास्थळी भेट
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पिप्रीं - लौकी अजमपूरे येथील घराचे कुलुप तोडून आतील लाकडी कपाट फोडून चोरट्यांनी ४० हजारांच्या रोख रक्कमेसह नऊ तोळे ७ ग्रॅम सोन्याचे दागिने अशा ४ लाख १९ हजार २०० रुपये किमतीच्या ऐवजाची चोरी केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्याने एकचं खळबळ उडाली असून सोमवारी श्वान पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली आहे.
याबाबत गणेश सोपान दातीर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, गावाच्या दक्षिण बाजूस असणाऱ्या शेतात राहत असून आजू बाजूस बऱ्याच अंतरावर वस्त्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने संपूर्ण कुटुंब घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. चोरट्यानी घरात कोणीचं नसल्याची संधी साधून घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूम मधील लाकडी कपाटीत उचका - पाचक करत एक दाणी सर, ओमपान, नथ, आंगठ्या, मचल्या, नॅकलेस, मंगळसूत्र, कर्णफुले, चांदीची जोडवी, रिंगा अशा दागिन्यासह ४० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली.
दरम्यान चोरांनी डल्ला मारल्याचे सकाळी ६ वाजेच्या सुमारास दातीर कुटुंबीयाच्या लक्षात आले. याबाबतची माहिती मिळताच आश्वीचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये हे आपल्या फौज फाट्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी घटनास्थळाची पहाणी करुन पोलिसांनी श्वान पथकाला पाचरण करत चोराची तपास शोध मोहीम हाती घेतली असून उपविभागीय पोलिस आधिकारी राहुल मदने यांनी घटनास्थळी जावून तपासाबाबत योग्य त्या सुचना पोलीसाना दिल्या आहेत.
दरम्यान याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रंजिस्टर नबंर ४७/२०२२ नुसार भादंवी कलम ४५७ व ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोरीचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये हे करत आहेत.