◻ डिग्रस गावच्या विकासाचा शिल्पकार काळाच्या पडद्याआड
◻ विविध पक्षातील दिग्गजाची श्रध्दांजली
संगमनेर Live | राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार आदि क्षेत्रात चतुर्स्र व्यक्तीमत्व संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील जेष्ठ नेते व चेअरमन या नावाने ओळखले जाणारे विद्यमान संरपच रखमाजी बाळाजी पाटील खेमनर (वय - ७०) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले आहे.
परखड वक्ते, मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून डिग्रंस पंचक्रोशीसह तालुक्यात खेमनर परिचित होते. डिग्रस गावच्या जडणघडणीत त्याचे मोठे योगदान होते. कुशाग्र बुध्दीच्या जोरावर तालुक्यासह नगर जिल्ह्यात त्यानी दांडगा जनसंपर्क निर्माण केला होता.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील या दोन्ही दिग्गज नेत्याशी त्याचे सलोख्याचे संबध होते. आपल्या हसमुख व विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या रखमाजी खेमनर याच्या निधनामुळे डिग्रस गावच्या विकासाचा खरा शिल्पकार हरपल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्याच्या अंत्यविधी प्रसंगी विविध पक्षातील मान्यंवरासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
दरम्यान रखमाजी पाटील खेमनर याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ, भावजय, सुन, नातवंडे, जावई व पुतणे असा मोठा परिवार आहे. संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या माजी संचालिका सौ. ताराबाई धुळगंड यांचे ते वडील होते.