◻ मुबंई नतंर आश्वीत ही ४ जणाविरुध्द गुन्हा दाखल
◻ चौघे पोलीसाच्या ताब्यात
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील वरंवडी येथिल प्रशांत संजय केदारी (वय - २९) या तरुणाला प्रेम प्रकरणावरुन चौघा जणानी बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून याबाबत मुबंई येथे दाखल केलेला गुन्हा आश्वी पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यामुळे ही माहिती मिळाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वरंवडी गावच्या शिवारात दि. ३१ मे रोजी ४.३० च्या सुमारास शंकर भास्कंर दळवी, गणेश दत्तात्रय साखरे, मच्छिद्रं साळवे व नवनाथ उत्तरेश्वर मुळे (सर्व रा. भोसरी, ता. पिपंरी चिचंवड, जि. पुणे) यानी प्रवेश करत येथिल प्रशांत संजय केदारी या तरुणाच्या घरात घुसुन तु आमच्या पाहुण्याच्या मुबंई येथिल घरी जाऊन तुमच्या पत्नीबरोबर सात वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे सांगून मोबाईल मधील माहिती त्याच्या मोबाईलवर का पाठवली. तु आमच्या बरोबर मुंबईला चाल व त्याना हे सर्व खोटे असल्याचे सांग असे म्हणत गणेश साखरे याने शिवीगाळ केली.
यावेळी या चौघानी प्रशांत केदारी याला त्याच्याकडील एम. एच. १४ बीके. ६६२५ या तवेरा गाडीत बळजबरीने बसवले. यावेळी प्रशांत केदारी याने आरडाओरड करण्यास सुरवात केल्याने चौघानी त्याला लाथाबुक्यासह टामीने मारहाण करुण जखमी केले. तसेच आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यामुळे देवनार पोलीस ठाणे, मुबंई येथे गुन्हा रजिस्टंर क्रमांक ००/२०२२ नुसार भादंवी कलम ४५२, ३६५, ३२४, ३२३, ५०४, ५०६, (२) ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. डी. साळुंखे व पोलीस हवालदार आर. एस. पाटील यानी याबाबत रिपोर्ट आश्वी पोलीस ठाणे सादर केल्यानतंर आश्वी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या गुन्ह्यातील चारही आरोपीना पोलीसानी ताब्यात घेतले असून त्याना न्यायालयात हजर केले असता ६ जून पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्यां मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक शिदें हे पुढील तपास करत आहेत.