◻ प्रदेश प्रतिनिधी म्हणून आ. डॉ सुधीर तांबे व डॉ. जयश्रीताई थोरात यांची निवड
संगमनेर Live | विधिमंडळ पक्षनेते व मा. प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या असून संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी जिल्हापरिषद सदस्य मिलिंद माधवराव कानवडे यांची तर शहराध्यक्षपदी सोमेश्वर सूर्यभान दिवटे यांची निवड झाली आहे.
काँग्रेस तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या निवडी निमित्त सुदर्शन निवासस्थान येथे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मावळते तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, महानंदाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, सुरेश थोरात, नवनाथ आरगडे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, युवक शहराध्यक्ष निखिल पापडेजा, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, हैदर आली, गौरव डोंगरे, सौ. प्रमिलाताई अभंग, सौ. अर्चनाताई बालोडे, सौ. निर्मलाताई गुंजाळ, आनंद वर्पे, संतोष हासे, सुहास आहेर, राजेंद्र चकोर आदींसह तालुका काँग्रेसचे सर्व माजी पदाधिकारी उपस्थित होते.
मिलिंद कानवडे व सोमेश्वर दिवटे हे दोघेही उच्चशिक्षित असून मिलिंद कानवडे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून संगमनेर खुर्द गटातून अतिशय प्रभावीपणे काम केले आहे. आ. थोरात व आ. डॉ. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास योजना त्यांनी या गटातून राबवले आहेत. मोठा जनसंपर्क सातत्याने काम करण्याची पद्धत व प्रभावी वकृत्व यामुळे त्यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून सोमेश्वर दिवटे यांनी युवकांची मोठी फळी उभी केली होती या माध्यमातून आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांमध्ये सातत्यांचा सहभाग राहिला आहे. या दोन्ही नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांची नवीन तालुकाध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, काँग्रेस हा लोकशाही जपणारा व देशाच्या विकासाचा शाश्वत विचार आहे. काँग्रेसवर अनेक संकटे आली तरी हा पक्ष कायम खंबीरपणे उभा राहिला आहे. काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मागील अध्यक्ष बाबा ओहोळ व विश्वासराव मुर्तडक यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. हीच परंपरा नवीन पदाधिकारी ही सांभाळतील.
आगामी काळामध्ये नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका ही येऊ घातल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील कार्यकर्त्याची सर्वात मजबूत आणि भक्कम फळी आहे. नव्या जुन्यांचा मेळघालत काम करणारा विकासाचा तालुका म्हणून आपला लौकिक आहे.
निळवंडेच्या कालव्यांच्या कामासाठी आपण मोठा निधी आणला आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये पाणी देण्याची आपले स्वप्न आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने कदाचित त्याही अगोदर पाणी आपण देऊ. आता कोणीही पाणी थांबू शकणार नाही. शहरातही सातत्याने मोठा निधी मिळवून विकास कामे मार्गी लावली आहे. सौ. दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहर सुंदर व वैभवशाली झाले आहे.
शहराच्या चारही बाजूने रस्त्यांच्या चौपदरीकरणाचे व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. स्वच्छ व मुबलक पाणी प्रत्येकाला मिळत आहे. रस्ते, वैभवशाली इमारतींसह सर्व सुविधा शहरात आहे. ही विकासाची वाटचाल कायम ठेवताना आगामी काळात सर्व निवडणुका ह्या अत्यंत मोठ्या फरकाने आपल्या सर्वांना जिंकण्यासाठी काम करायचे आहे असेही ते म्हणाले.
आमदार डॉ तांबे म्हणाले की, राज्याचे नेते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात काँग्रेसचे मोठे काम होत आहे. संगमनेर तालुका हा कायम काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहील आहे. नवीन पदाधिकाऱ्यांना आगामी काळामध्ये मोठी संधी आहे. यावेळी मिलिंद कानवडे व सोमेश्वर दिवटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी नवीन ग्रामीण उपाध्यक्ष विजय रामनाथ रहाणे, बाळासाहेब गोपीनाथ गायकवाड, राजेंद्र देवराम दिघे, खजिनदार म्हणून के. के. थोरात तर सदस्य म्हणून रायभान पवार, रामनाथ कुऱ्हे, दत्तात्रय कोकणे, संजय साबळे, जिल्हा प्रतिनिधी म्हणून ॲड. त्रिंबक गडाख, ॲड अशोक हजारे, सोमनाथ गोडसे, भारत शेलकर, ह.भ.प. नवनाथ आंधळे ,भारत वर्पे, सौ. मीराताई शेटे यांची निवड झाली आहे.
शहर उपाध्यक्ष म्हणून गणेश मादास, ज्ञानेश्वर नाईक, खजिनदारपदी डॉ. सुचित गांधी तर सदस्य म्हणून राकेश नवले, सतीश शिंदे ,कपिल क्षत्रीय यांची निवड झाली आहे. जिल्हा प्रतिनिधी म्हणून माजी शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, हिरालाल पगडाल, अभय खोजे, सौ. छाया उपाध्ये ,सौ.सुषमा भालेराव, विलास ताजने यांचे निवडी बद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले तर निखिल पापडेजा यांनी आभार मानले.
आमदार डॉ. तांबे व डॉ. जयश्रीताई थोरात यांची प्रदेश कमिटीवर प्रतिनिधी म्हणून निवड
काँग्रेसच्या नव्याने होत असलेल्या निवडणुकांमधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी म्हणून संगमनेर शहर ब्लॉक कमिटीतून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांची तर ग्रामीण ब्लॉकमधून कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांची निवड झाली आहे .यावेळी आ. डॉ. तांबे व डॉ. जयश्रीताई थोरात यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.