◻ कलर मराठीवर सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात टॉप १६ मध्ये झाली निवड
संगमनेर Live | कलर मराठी वाहिनीवरील लोकप्रिय असलेला सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात ५ हजार विद्यार्थ्यामधून टॉप - १६ मध्ये आलेल्या जोर्वे येथील रहिवाशी असलेल्या अविनाश मधुकर कदम याचा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी संत्कार केला आहे .
अविनाश कदम हा जोर्वे येथील रहिवासी असून त्याला लहानपणापासूनच गायन्याची आवड होती. अवधूत गुप्ते हा त्याचा आदर्श असून संगमनेर मध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून त्याचा सातत्याने सहभाग होता.
कलर मराठीवर नव्याने सुरू झालेल्या सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला असून ५ हजार विद्यार्थ्यामधून त्याची टॉप १६ मध्ये निवड झाली आहे. त्याचे कार्यक्रम नुकतेच द वाहिनीवर प्रसारित झाले आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सुदर्शन निवासस्थानी त्याचा सत्कार केला.
यावेळी समवेत महानंदाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, नुतन अध्यक्ष मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, संतोष हासे, सुरेश थोरात, ह. भं. प. नवनाथ महाराज आंधळे यांचेसह प्रकाश कदम, प्रभाकर कदम आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा सातत्याच्या विकास कामांमुळे सर्व क्षेत्रात प्रगतीवर आहे. शैक्षणिक ,सांस्कृतिक, वैचारिक क्षेत्रातही संगमनेर तालुक्याचा राज्यभर लौकिक आहे. जोर्वे या गावच्या मुलांने सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात सहभाग नोंदवला असून हे निश्चित तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे.
याप्रसंगी अविनाश कदम म्हणाला की, संगमनेर तालुक्यात कायम संत आणि कलावंतांचा सन्मान होत असून आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिलेले आशीर्वादामुळे आपण भारावून गेलो असून संगमनेर तालुक्याची प्रतिनिधीत्व मुंबईत करताना मला सार्थ अभिमान वाटत आहे.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबा ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर सुरेश थोरात यांनी आभार मानले.