संगमनेर Live (नाशिक) | उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार होत आहेत. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी व रविवारी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या हृदयाच्या छीद्राची शस्रक्रिया मोफत केली जाते.
या महिन्यात या शस्रक्रिया शनिवारी दिनांक २७ ऑगस्ट आणि रविवारी दिनांक २८ ऑगस्ट रोजी होणार आहेत. आपल्याही बालकाची अशा प्रकारची शस्रक्रिया करावयाची असल्यास आजच हॉस्पिटलमध्ये सल्ला घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारांवरील उपचार होत आहेत. गंभीर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया यासाठी नागरिकांना पूर्णपणे निशुल्क, गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य या दोन्ही योजना उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एसएमबीटी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ आतापर्यंत हजारो रुग्णांना झाला आहे.
गंभीर आजारांवरील उपचार, शस्त्रक्रिया यासाठी मोठा खर्च येतो. तो सर्वसामान्य, आर्थिकरित्या दुर्बल रुग्णांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेक जण उपचार घेणे, शस्त्रक्रिया करुन घेणे टाळतात. वेळेत आणि योग्य उपचार न झाल्याने अनेकांचे जीवही जातात. कुठल्याही रुग्णाची उपचारांअभावी परवड होऊ नये, यासाठी सरकारने जीवनदायी योजना आणल्या आहेत.
या योजनांचा रुग्णांना लाभ मिळावा त्याकरिता परिपूर्ण वैद्यकीय सेवा, सुविधा असलेली राज्यातील ठराविक रुग्णालये या दोन्ही योजनेशी संलग्न आहेत. योजना सुरू झाल्यापासूनच उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे एसएमबीटी चॅरिटेबल हॉस्पिटल या दोन्ही योजनांशी जोडले गेलेले आहे.
एसएमबीटी हॉस्पिटलच्या या शिबिरामध्ये मोफत शस्रक्रिया करून घेण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात बालक रुग्ण याठिकाणी येत असतात. त्यामुळे शस्रक्रिया करण्याच्या आधी वैद्यकीय सल्ला येथील वैद्यकीय अधिकारी देत असतात. आजही रुग्ण याठिकाणी आल्यास त्याची तपासणी केली जात असून त्यांच्यावर या महिन्यात या शस्रक्रिया शनिवारी दिनांक २७ ऑगस्ट आणि रविवारी दिनांक २८ ऑगस्ट रोजी होणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी हॉस्पिटलशी आजच संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एसएमबीटी हॉस्पिटलची वैशिष्ट्ये..
एसएमबीटी हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात धामणगाव-घोटी खुर्द येथे असून रुग्णांच्या विविध आजारांवरील उपचारांसाठी पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी सेवेत असतात. ८१० बेडचा आंतररुग्ण विभाग, १०० आयसीयू बेड, १३ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, १० एनआयसीयू आणि पीआयसीयू बेड, २४ तास डायलिसीस, मेडिकल, रक्तपेढी, रुग्णवाहिका सुविधा, रुग्णांची कुटुंबियांसाठी जेवण, राहण्याची सुविधा ही एसएमबीटी हॉस्पिटलची वैशिष्ट्ये आहेत.
स्वतंत्र कक्ष, योग्य मार्गदर्शन..
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारकांबरोबरच सध्या सफेद शिधापित्रका धारकांना देखील मिळतो आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य या दोन्ही योजनांच्या संदर्भाने रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष अशा स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. येथील प्रशिक्षित कर्मचारी योजनेत सामाविष्ट असलेल्या आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया या संदर्भाने योग्य मार्गदर्शन करतात. १३ जणांची टीम येथे कार्यरत आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन मिळते.