◻ तरुणाच्या आकस्मात निधनामुळे पंचक्रोशीत शोककळा
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथिल अजय कैलास नागरे (वय - २५) या तरुणाने गुरुवारी दुपारी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत आश्वी पोलिसांना शेडगावचे पोलीस पाटील दिलीप सांगळे यानी माहिती अशी की, दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास राजेद्रं देवराम आंधळे यानी फोन करुन माहिती दिली की, अजय कैलास नागरे हा अंबादास म्हतु नागरे याच्यां गट नंबर २७१/२ मधील ऊसाच्या क्षेत्रात कडेला मृत अवस्थेत पडलेला आहे. तसेचं त्याच्या कडेला विषारी औषधाची बाटली पडलेली असून त्याच्या तोडाचा वास येत आहे. त्यामुळे घटनेची माहिती मिळताचं मी घटनास्थळी दाखल होऊन पोलीसाना याबाबत माहिती कळवली व अजय नागरे याचां मृतदेह पुढील कारवाईसाठी उपस्थित नागरीकाच्या मदतीने लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता.
दरम्यान सायंकाळी उशीरा शोकाकूल वातावरणात अजय नागरे याच्यां पार्थिव देहावर अत्यंसंस्कार करण्यात आले आहे.