◻ संगमनेर मध्ये जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा
संगमनेर Live | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्यघटना दिली. या राज्यघटनेमुळे समाजातील सर्व घटकांना समतेचा अधिकार मिळाला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक राष्ट्र पुरुषांबरोबर आदिवासी समाजाचेही मोठे योगदान असल्याचे गौरवोदगार काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.
संगमनेर बस स्थानक येथे आदिवासी विचार मंच घुलेवाडी यांच्या वतीने जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, सोमेश्वर दिवटे, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, विश्वासराव मुर्तडक, अजय फटांगरे, रमेश गफले, सुभाष सांगळे, चेतन मेने, दिलीप सोनवणे, मोहन मोरे, किशोर घाणे, सुदर्शन घाणे, सोमा पारधी, अमित कुदळ, सोमनाथ भालेराव, ज्ञानेश्वर राक्षे, प्रा. बाबा खरात बाळकृष्ण गांडाळ, निखिल पापडेजा आदी उपस्थित होते.
यावेळी यशोधन जनसंपर्क कार्यालय येथेही बिरसा मुंडा यांना अभिवादन करून आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी काँग्रेसचे शहर अध्यक्ष किरण काळेंसह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेमुळे प्रत्येकाला मताचा अधिकार आला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता हा विचार राज्यघटनेने दिला आहे. आदिवासी बांधव हा अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगला आहे. मात्र त्याच्या जीवनात समृद्धी यावी. तो मुख्य प्रवाहात सामील व्हावा यासाठी भारतीय राज्यघटनेने विशेष अधिकार दिले आहेत.
आदिवासी बांधवांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत मोलाचे योगदान आहे. धाडसी कामगिरी करताना त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. या समाजाचा कायम सन्मान व्हावा ही आपली भूमिका राहिली आहे. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे याकरता जय हिंद आश्रम शाळेतून अत्यंत गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जात आहे.
ज्या राज्यघटनेने आपल्याला समतेचा अधिकार दिला त्या राज्यघटनेचा विचार जपण्यासाठी कायम समतेच्या विचारांच्या पाठीशी उभे रहा असेही ते म्हटले
आमदार डॉ. तांबे म्हणाले की, काँग्रेसने आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प केला होता. या समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या. उत्तम शिक्षण, मिळवून देण्यासाठी विशेष योजना केल्यामुळे आदिवासी समाजातील अनेक विद्यार्थी उच्च पदावर काम करत आहेत. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांचा गौरव होणे अत्यंत अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले.
या वेळी राहुल शिंदे, बापू मेढे, सागर कुदळ, संदीप दळवी, संतोष घाणे, योगेश दरेकर, अंकुश घाणे, नितीन मेने, अभिजीत मेढे, वैभव दरेकर, सुरज घाणे, चांगदेव कुदळ, संतोष पारधी, भाऊसाहेब शिंदे आदिंसह आदिवासी विचार मंचाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.