◻ पंधरा दिवसापासून पिण्याच्या पाण्यासाठी होतायत नागरीकाचे हाल
◻ लेखी आश्वासनानतंर मोर्चा स्थगित
संगमनेर Live | ऐन पावसाळ्यात मागील पंधरा दिवसापासून संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील ग्रामस्थाना पिण्याचे पाणी केवळ नावालाचं येत असल्याने संतप्त झालेल्या नागरीकानी मंगळवार दि. २३ ऑगस्टं रोजी ग्रामपंचायत येथे सकाळी भव्य ‘हंडा मोर्चा’ काढला होता. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानतंर मोर्चा शांततेत स्थगित करण्यात आला.
उंबरी बाळापूर येथे मंगळवारी सकाळी गावातून मोर्चा थेट ग्रामपंचायतपढे दाखल झाला होता. यावेळी उपस्थित मोर्चेकऱ्यानी ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. गावाच्या चारही दिशाला पाण्याचा मोठा साठा आहे. गावाच्या तिरावरुण प्रवरा नदी बरोबरचं गावाच्या मध्यभागातून प्रवरा डावा वाहत आहेत. परंतू गावातील नागरीकाना मागील पंधरा दिवसापासून तीव्रं पाणी टचाईचा सामना करावा लागत असून ग्रामपंचायत मार्फत नियमित होणाऱ्या पाणी पुरवठ्याकडे ग्रामपंचायत प्रशासन तसेचं जनतेने निवडून दिलेले सदंस्य दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप नागरीकानी करत ग्रामपंचायतीचे सरपंच व प्रशासनाला यावेळी चागलेचं धारेवर धरले होते.
यावेळी गावातील सर्वसामान्य नागरीकाला पिण्याचे पाणी मिळत नाही, गावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेमुळे साथीचे रोग प्रसार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकाचे आरोग्य लक्षात घेता औषध फवारणी करायला ग्रामपंचायतीकडे वेळ नाही. स्ट्रीट लाईट बंद राहणे, वाड्या वस्त्याना जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुरावस्था, त्यामुळे नागरीकानप्रमाणे शालेय विद्यार्थ्यानची होणारी गैरसोय यासारख्या मुलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यायाला ग्रामपंचायतीला वेळ नसल्याचा गंभीर आरोप उपस्थित ग्रामस्थानी करुन समस्याचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली. यावेळी मुलभूत प्रश्नासंदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यं आले नसल्याने मोर्चेकऱ्यानी त्याना शालजोडीतून चागलेचं फटकारले आहे.
यावेळी संतप्त नागरीकानी पिण्याचे पाणी किमान ५० मिनटे दररोज सोडण्यात यावे, पाणी येण्याची वेळ निश्चित करण्यात यावी व रात्री - अपरात्री पाणी सोडू नये. वारंवार विद्युत मोटार जळणे, लाईट नाही, पाइपलाइन फुटने या कारणाबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, पाणी पुरवठा विहीर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावा व त्याचे सॉफ्टवेअर सरपंच व ग्रामसेवक यांच्या मोबाइलला कनेक्ट करावे, साथीच्या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी गावात औषध फवारणी करावी, गावासह वाड्या - वस्त्याना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने मुरूम टाकण्यात यावा, ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी याना योग्य नियोजन व पाणी सोडणेबाबत सूचना कराव्यात, स्ट्रेट लाईटचा प्रश्न मार्गी लावावा अशा मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या असून या मूलभूत प्रश्नाबाबत सरपंच व प्रशासनाला जाब विचारला आहे.
यावेळी संतप्त झालेल्या नागरीकाशी सरपंच किरण भुसाळ, उपसरपंच नानासाहेब उंबरकर यानी संवाद साधत ऐत्या दोन दिवसात या समस्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र नागरीक लेखी आश्वासनावर अडून बसल्याने ग्रामविस्तार अधिकारी राठोड याच्यां पुढाकारातून सरपंच व उपसरपंच यानी लेखी आश्वासन दिल्यानतंर हा ‘हंडा मोर्चा’ शांततेत स्थगित करण्यात आला असला तरी ऐत्या दोन दिवसात पाणी समस्या सोडवली न गेल्यास आक्रमक आदोंलनाचा इशारा यावेळी मोर्चेकऱ्यानी दिला आहे.
या ‘हंडा मोर्चा’ प्रसंगी रिपाईचे तालुकाध्यक्ष अशिष शेळके, अँड. रवी शेळके, एकलव्य संघटनेचे अनिल बर्डे तसेच ग्रामविस्तार अधिकारी राठोड, सरपंच किरण भुसाळ, उपसरपंच नानासाहेब उंबरकर, ग्रामसेवक मांढरे, भागवत उंबरकर, अनिल भुसाळ, विनायक शेळके, उल्हासराव गायकवाड, सुनील शिखरे, डँनियल गायकवाड, राजेद्रं भुसाळ, सागर भुसाळ, लहानु डोखे, गणेश डोखे, दादू बर्डे, संजय बर्डे, सविता शेळके, शैला शेळके, शोभा शेळके, रंजना शेळके, आरती शेळके, कोमल शेळके, संगीता बर्डे, आशाबाई बर्डे, मंदा बर्डे, कमल बर्डे, उषा बर्डे, मिरा बर्डे, दया बर्डे, सुनिता माळी, हौसाबाई साळुंखे, अरुणा माळी, योगिता बर्डे, शोभा बर्डे, चद्रंभागाबाई बर्डे, ताराबाई बर्डे, अर्चना बर्डे, विमल बर्डे, छाया बर्डे आदिसह गावातील महिला, पुरुष व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान यावेळी मोर्चाला कोणतेही आक्रमक अथवा हिसंक वळण लागू नये यासाठी आश्वीचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, सहाय्यक फौजदार डी. डी. बर्डे, पोहेकॉ ए. डी. शिदें, पोकॉ पी. जे. दैमिवाळ, पोकॉ निलेश वर्पे आदिसह पोलीस व होमगार्ड याचां मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी उपस्थित होता.