◻️ गायराण भागात राहणाऱ्या ११ कुटुंबाचा प्रपंच पाण्यात
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात मागील अनेक दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे ओढे, नाले, लहान मोठे पाझर तलाव व बंधारे ओसडून वाहत असून हेचं अतिरक्त झालेले पावसाचे पाणी तालुक्यातील आश्वी बुद्रुक शिवारातील गायराण भागात राहणाऱ्या ११ कुटुंबाच्या घरात घुसल्याने ५० ते ६० लोकाचा प्रपंच पाण्यात गेल्यामुळे या कुटुंबानी हाबंरडा फोडला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोंची - मांची व निमगावजाळी शिवारात पाझर तलाव आहेत. मागील अनेक दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे हे पाझर तलाव पुर्ण भरल्यामुळे त्यातील पाणी हे ओसंडून वाहत आहे. मंगळवारी हे पाणी ओढ्याने वाहत येऊन ओढ्याच्या कडेला असलेल्या ११ घरामध्ये घुसले.
त्यामुळे येथील नागरीकाचे संसारपयोगी साहित्य, अंथरुणासह, खाण्या - पिण्याच्या वस्तू भिजल्या आहेत. या आचनक आलेल्या पाण्यामुळे येथिल नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरु झाले असून गाळमिश्रीत गुडघाभर पाण्यात उभे राहावे लागत असल्याने नागरीकाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच याचं परिसरातील अनेक शेतांमध्ये पाणी घुसल्यामुळे नागरीकासह शेतकऱ्याचेही प्रचंड नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे.
दरम्यान याठिकाणी पाणी घरात घुसल्याची माहिती मिळताचं प्रशासनाकडून आश्वीचे कामगार तलाठी डी. बी. भालचीम याच्यांसह कर्मचारी सोमनाथ गाडेकर हे घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी पाणी घुसलेल्या घराची पाहणी केली असून या कुटुंबाची शेजारी असलेले विनायक जऱ्हाड याच्यां पोल्ट्री शेडमध्ये तात्पुरती सोय करुन दिलासा दिला आहे. तर संगमनेरचे प्रातांधिकारी यानी याबाबत माहिती घेतली आहे.
आश्वी बुद्रुक येथे घरात पाणी घुसलेल्या ठिकाणाची मी पाहणी केली असून या कुटुंबाला प्रशासनाने त्वरित आधार देऊन अर्थिक मदत करणे गरजे आहे. याठिकाणी पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संगमनेर पंचायत समितीचे माजी सदंस्य व विरोधीपक्ष नेते सरुनाथ उंबरकर यानी केली आहे.