संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द व पंचक्रोशीतील गावानमधील शेतकरी, दूध उत्पादक, व्यापारी, व्यावसायिक तसेच गोर-गरीब जनतेची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माऊली कृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पंतसस्थेचे संस्थापक मार्गदर्शक आण्णासाहेब भोसले याच्यां मार्गदर्शनाखाली स्विकृत संचालक पदी नुकतीचं संजय सुभाष पाटील गायकवाड व सुयोग शरद सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
माऊली कृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पंतसंस्था आश्वी खुर्द येथे मागील २५ वर्षापासून कार्यरत असून संस्थेची सुसज्ज अशी मुख्य बाजारपेठेत भव्य इमारत आहे. आश्वी खुर्द सह पंचक्रोशीतील गावातील शेतकरी, दूध उत्पादक, व्यापारी, व्यावसायिक, महिला व पुरुष बचतगट तसेच गोर-गरीब जनतेला पंतसंस्था आधार देत असल्याने परिसराची कामधेनू म्हणून संस्था ओळखली जाते.
काही दिवसापूर्वी माऊली कृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पंतसस्थेचे संस्थापक मार्गदर्शक व जेष्ठ नेते आण्णासाहेब भोसले याच्यां मार्गदर्शनाखाली नुतन संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रीया बिनविरोध पार पडली होती. यानतंर झालेल्या बैठकीमध्ये अँड. अनिल भोसले यांची चेअरमन तर व्हा. चेअरमन पदी बाळासाहेब सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती.
दरम्यान नुकतीच संस्थेच्या कार्यालयात स्विकृत संचालक पदाच्या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकार संजय सुभाष पाटील गायकवाड व सुयोग शरद सोनवणे यांची स्विकृत संचालक पदी निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन अँड. अनिल भोसले, व्हा. चेअरमन बाळासाहेब सोनवणे, मकरंद गुणे, निलेश भवर, संजय भोसले, कैलास गायकवाड, प्राचार्य मुन्तोडे, संजय कहार आदि उपस्थित होते.