'ई-पीक पाहणी' व्हर्जन-२ अँपद्वारे तात्काळ करण्याचे महसूल विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

संगमनेर Live
0

राहाता तालुक्यातील शेतकऱ्याना तहसिलदार कुंदन हिरे यांचे आवाहन

संगमनेर Live (शिर्डी) | राहाता तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पर्यत पीक पाहणी नोंदवली नाही अशा शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते. तेव्हा शेतकऱ्यांनी तात्काळ 'ई-पीक पाहणी' अँपद्वारे पीक पाहणी नोंदवावी. असे आवाहन राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

पीक पाहणी मोबाईल द्वारे नोंदविण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२२ आहे. आपण पीक पाहणी न नोंदविल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते. पीक पाहणी नोंदणी करताना अडचण आल्यास मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संपर्क साधावा.

शेतकऱ्यांनी आपल्या शेताची 'ई- पीक पाहणी' नोंदवावी. पीक पाहणी मोबाईल वरून करण्याची सुविधा शासनाने दिलेली आहे. ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप तयार करण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवरुन आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. 

तरी अद्याप पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी मोबाईल वरून आपल्या शेतातील पिकाची नोंदणी केली नाही. अशा शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवर जाऊन ही ई- पीक पाहणी व्हर्जन २ हे अॅप डाऊनलोड करून तात्काळ ई-पीक पाहणी करण्यात यावी. असे आवाहन‌ही  तहसीलदार हिरे यांनी केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !